Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Messaging Apps Banned : भारत सरकारनं ‘या’ १४ मेसेजिंग ॲप्सवर घातली बंदी, वाचा कारण आणि संपूर्ण यादी

10

Messaging Apps Banned in India : जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवत असल्याच्या आरोपामुळे भारतात १४ मेसेजिंग ॲप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2020 च्या कलम 69A अंतर्गत या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी पुष्टी केली की हे ॲप्स दहशतवादी प्रचार पसरवण्यासाठी वापरले जात होते. एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या ॲप्सचा अॅक्सेस पाकिस्तानकडून सूचना प्राप्त मिळवण्याठी देखील केला जात होता. म्हणजेच य ॲप्समुळे पाकिस्तानकडून आपली हेरगिरी होण्याचीही भिती होती. दरम्यान या सर्वांमुळे या ॲप्सवर बंदी घातली गेली आहे. तर नेमके कोणते ॲप्स या यादीत आहे ते सर्व जाणून घेऊ. मेसेजिंग ​ॲप्सची नाव तसंच त्यांच्या संबधित सर्व माहिती जाणून घेऊ…

Crypv​iser आणि Enigma

Crypviser’ Secure Messenger हे एक सर्वात खाजगी मेसेजिंग ॲप असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित हे ​ॲपही भारत सरकारने ब्लॉक केलं आहे. याशिवाय ​Enigma ॲपही पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनी करते, या ॲपच्या ग्रुपमध्ये १००,००० सदस्य असू शकतात आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स तसेच ग्रुप्समध्ये सपोर्ट करतात.

​वाचाः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारावरून वाद, जाणून घ्या त्यांची सॅलरी

​Safeswiss आणि Wickr Me: An Amazon-backed app

safeswiss-wickr-me-an-amazon-backed-app

Safeswiss हे स्वित्झर्लंड बेस्ड अॅपचा देखील दावा असा आहे की हे अॅप सर्वात व्यापक, डिव्हाइस-टू-डिव्हाइस, मिलिटरी-ग्रेड, रीअल-टाइम एनक्रिप्शनद्वारे संरक्षित केलं गेलेलं आहे. पण यातही भारत सरकारला दोष आढळल्याने हे बॅन केलं गेलं आहे. याशिवाय Wickr Me: An Amazon-backed app हे अॅप अॅमेझॉनने 2021 मध्ये विकत घेतले होते परंतु डिसेंबर 2023 मध्ये ते बंद होत आहे.

​वाचा : Smartphone Explode : हीच ‘ती’ ८ कारणं ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो, ‘अशी’ घ्या काळजी

MediaFire आणि Briar

mediafire-briar

MediaFire हे एक अधिक स्टोरेज ऑफर करणारं अॅप आहे.जे युजर्सना फोटो, व्हिडिओ, संगीत आणि डॉक्यूमेंट्स अपलोड करण्यास मदत करते. त्यानंतर वापरकर्ते फोन, टॅबलेट, संगणक किंवा वेबसह कुठूनही अॅपमध्ये प्रवेश करू शकतात. तसंच Briar: Available only on Play Store हे सर्व पीअर-टू-पीअर एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप आहे. वापरकर्ते जवळच्या संपर्कांशी याद्वारे थेट कनेक्ट होऊ शकतात. हे दोन्ही अॅप्सही बॅन आहेत.

​वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

BChat आणि Nandbox Messenger

bchat-nandbox-messenger

BChat हे बेलडेक्स ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानावर आधीरित अॅप असून एक दमदार मेसेजिंग प्लॅटफॉर्म असल्याचा दावा करते. तसंच ​Nandbox Messenger या अॅपवर युजर एकाच खात्यातून अनेक प्रोफाइल तयार करू शकतात. हे दोन्ही अॅप्सही बॅन केले गेले आहेत.

​​वाचा : फेक कॉल आणि मेसेजपासून सुटका होणार, Aitel Jio आणि Vi चा AI बेस्ड नवा प्लान

Conion आणि ​IMO

conion-imo

Conion हे एक असं अॅप आहे, जिथे याचा वापर करण्यासाठी फोन नंबर किंवा ईमेल पत्ता आवश्यक नाही. तुम्ही पूर्ण अनोळखीपद्धतीने Conion वापरु शकता. असा कंपनीचा दावा आहे. तसंच IMO हे Play Store आणि App Store वर एक लोकप्रिय अॅप जे वापरकर्त्यांना विनामूल्य व्हिडिओ कॉल आणि त्वरित संदेशांना अनुमती देते. पण हे दोन्ही अॅप्सही बॅन आहेत.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​Element आणि 2nd Line

element-2nd-line

​Element हे अॅप विविध टीम्समध्ये संभाषणासाठी अधिक उपयुक्त असून मॅट्रिक्स नावाच्या ओपन नेटवर्कवर तयार केले आहे. तसच ​2nd Line हे अॅप तुमच्या फोनला अतिरिक्त लाइन प्रदान करण्यासाठी मोबाइल डेटा किंवा वायफाय कनेक्शन वापरते.यासाठी फक्त अॅप डाउनलोड करा, फोन नंबर निवडा आणि तुमच्या फोनवरील अतिरिक्त लाइनवरून अमर्यादित कॉलिंग आणि मजकूर पाठवणे त्वरित ऍक्सेस हे सारं वापरु शकता.

​वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Zangi Messenger आणि Threema

zangi-messenger-threema

​Zangi Messenger देखील युजर्सना फोन नंबरशिवाय आणि वैयक्तिक माहिती शेअर केल्याशिवाय नोंदणी करण्याची परवानगी देते. तर Threema हे अॅप पूर्णपणे Unknown बनून वापरले जाऊ शकते. यामुळेच या दोन्ही अॅप्सवरही बंदी टाकण्यात आली आहे.

​​वाचा : जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.