Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सर्वात आधी UPI कस्टमर सपोर्टशी संपर्क साधा
जर कोणत्याही युजरने चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले आहे, तर त्याने सर्वात आधी संबधित अॅपच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधाला पाहिजे. असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लिहिलं आहे. म्हणजेच Gpay, PhonePe, Paytm किंवा कोणत्याही इतर युपीआय अॅपद्वारे व्यवहार केला असल्यास त्यांच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा. त्यांच्याकडूनच संपूर्ण मदत मिळणार आहे.
वाचा : Battery Saver: फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
BHIM अॅपच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा
संबधित अॅपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा ऑप्शन असून तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यास BHIM अॅपच्या कस्टमर केअरशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता. भीम कस्टमर केअरसाठी टोल फ्री क्रमांक १८००१२०१७४० हा आहे. या नंबरवर कॉल करून, तुम्ही संपूर्ण तपशील सांगू शकता, ज्यानतंर तुम्हाल रिफंड मिळण्यात मदत होईल.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
तुमच्या बँकशी संपर्क साधा
UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असल्यास तुम्ही ज्या खात्यातून ही रक्कम गेली आहे. त्या तुमच्या बँकेशी संपर्क साधा. व्यवहार आयडी, खाते क्रमांक, प्राप्तकर्त्याचा UPI आयडी, फोन नंबर यासारखे संपूर्ण तपशील बँकेसोबत शेअर करा. तुम्ही बँक व्यवस्थापनाच्या मदतीने देखील रिफंड मिळवू शकता.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
NPCI पोर्टलवर तक्रार नोंदवा
UPI हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे. NPCI स्वतः UPI द्वारे सर्व व्यवहारांशी संबंधित शंकाचे, तक्रारींचे व्यवस्थापन करते. त्यामुळे तुम्ही चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर केले असल्यास याच NCPI कडे तक्रार करु शकता. ज्याने तुम्हाला तुमचा रिफंड मिळण्यात मदत होईल.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
अशी दाखल करा NPCI वर तक्रार
1: सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये NPCI ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
2: आता तुम्हाला वरच्या मेनू बारमधील ‘What we do’ विभागात जावे लागेल.
3: येथे ड्रॉप डाउन मेनूमध्ये, तुम्हाला UPI वर टॅप करावे लागेल आणि Dispute Redressal Mechanism वर क्लिक करावे लागेल.
4: खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला तक्रार विभाग दिसेल.
5: आता तुम्हाला व्यवहाराचे स्वरूप निवडावे लागेल.
6: आता तुम्हाला इश्यू सेक्शनमध्ये “Incorrectly transferred to another account” निवडावे लागेल. यासोबतच तुम्हाला सर्व माहिती नीट भरून तुमची तक्रार नोंदवावी लागेल.
वाचा : फेक कॉल आणि मेसेजपासून सुटका होणार, Aitel Jio आणि Vi चा AI बेस्ड नवा प्लान
बँकिंग लोकपालशी देखील संपर्क साधू शकता
तुम्ही केलेल्या युपीआय संबधित तक्रारीवर लोकपाल नियुक्त केला जातो. यासोबतच या प्रकरणाशी संबंधित अपडेट्ससाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या नियमित संपर्कात राहावे लागेल. दरम्यान तरीही निवारण झालं नाही तर RBI मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे सांगतात की बँक किंवा UPI अॅप 30 दिवसांच्या आत प्रतिसाद देण्यास अयशस्वी झाल्यास, तुमचा अर्ज नाकारला किंवा तुम्ही त्यांच्या प्रतिसादावर समाधानी नसाल, तर तुम्ही बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी, तुम्हाला एका कागदावर संपर्ण समस्या लिहून पोस्टाद्वारे तक्रार पाठवावी लागेल. बँकिंग लोकपाल तुम्हाला नक्कीच मदत करतील.
वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट