Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sony Bravia X70L स्मार्ट टीव्ही लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

13

नवी दिल्लीः सोनीने भारतात आपली Bravia X75L आणि Bravia X80L टीव्ही सीरीज लाँच केली होती. आता कंपनीने Bravia X70L सीरीज अंतर्गत दोन नवीन मॉडल्स लाँच केले आहेत. Bravia X70L मध्ये ४३ इंच आणि ५० इंच डिस्प्ले दिला आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Sony Bravia X70L चे फीचर्स आणि किंमती संबंधी सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

Sony Bravia X70L ची किंमत
Sony Bravia X70L च्या ४३ इंच डिस्प्ले मॉडलची किंमत ५९ हजार ९०० रुपये आहे. तर याच्या ५० इंच डिस्प्ले मॉडलची किंमत ७० हजार ९०० रुपये आहे. Sony Bravia X70L ला सोनी सेंटर, ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्स वरून खरेदी करू शकता.

वाचाः Android युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’१९ॲप्स तुमच्यासाठी धोकादायक, लगेचच करा डिलीट

Sony Bravia X70L चे फीचर्स
Sony Bravia X70L दोन स्क्रीन साइज ४३ इंच आणि ५० इंच मध्ये उपलब्ध आहे. यात ४के डिस्प्ले रिझॉल्यूशन सोबत X-Reality PRO फीचर दिले आहे. 2K कंटेंट किंवा FHD ला 4K रिझॉल्यूशन मध्ये बदलण्याची क्षमता ठेवते. यात X1 4K HDR पिक्चर इंजिन आहे. जे नॉइजला कट करणे आणि डिटेल्सला बूस्ट करण्यात मदत करते. टीव्हीत Motionflow XR टेक्नोलॉजी सुद्धा दिली आहे. Sony Bravia X70L मध्ये ड्युअल स्पीकर्स दिले आहेत. जे 20W साउंड आउटपुट ऑफर करते. यात डॉल्बी ऑडियो साउंड टेक्नोलॉजी सुद्धा दिली आहे. स्मार्ट टीव्ही X-Protection PRO टेक्नोलॉजी सोबत येते.

वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

ऑपरेटिंग सिस्टम मध्ये Sony Bravia X70L टीव्ही गुगल टीव्ही ओएस वर काम करते. हे अॅप्पल एअरप्ले आणि अॅप्पल होम किट सोबत कम्पेटिव्ह आहेत. टीव्ही व्हॉइस एनेबल्ड रिमोट सोबत येतात. यात गुगल असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो. रिमोटवर अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार, यूट्यूब, सोनी लिव्ह आणि म्यूझिकसाठी ६ हॉटकीज सुद्धा दिले आहे.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.