Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Amazon च्या सेलमध्ये पॉवरफुल स्मार्टफोन्सवर तगडी सूट, OnePlus, Redmi, Realme चे फोन्स घेण्याची परफेक्ट वेळ
Redmi Note 12 5G (किंमत – १५,२४९ रुपये)
नुकताच म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये लॉन्च झालेला Redmi Note 12 5G स्मार्टफोन हा कमी बजेटमध्ये दमदार फीचर्ससह येणारा एक बेस्ट फोन आहे. कारण याची किंमत केवळ १५,२४९ रुपये इतकी असून यामध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. यामुळे फोनची स्पीड आणि काम करण्याची पद्धत दोन्ही वेगवान असून चार्जिंगचा वेगही चांगला आहे. फोनची बिल्ड गुणवत्ता देखील मजबूत आहे. तुम्हाला फोन दैनंदिन कामे करायचा असेल, तर Redmi Note 12 5G हा परिपूर्ण पर्याय आहे. थेट सूर्यप्रकाशात फोन वापरणे सोपे आहे. तथापि, कॅमेरा कामगिरी सरासरी आहे. हा Redmi फोन Rs 15,249 साठी एक उत्तम पर्याय आहे.
वाचा : तुमच्या Android फोनमध्ये या ५ सेटिंग्स सुरु ठेवणं पडेल महाग, ऑन असतील तर आताच करा ऑफ
Realme Narzo 50 Pro (किंमत १८,७४९ रुपये)
रेडमी नंतर Realme कंपनीचा Narzo 50 Pro हा देखील दमदार बिल्ड क्वॉलीटीसह बजेटमध्ये येणारा फोन आहे. Realme Narzo 50 Pro Dimensity 920 चिपसेटसह येतो. बेंचमार्कमध्ये, हा फोन नथिंग फोन (1) सारखा काम करतो. स्मार्टफोनच्या बाजूला एक नॉच आहे, 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज यात आहे. हँडसेटमध्ये AMOLED स्क्रीन आणि 90Hz रिफ्रेश रेट सारखे फीचर्स आहेत. या सगळ्यानंतर किंमत म्हणाल तर १८,७४९ रुपये इतकी आहे.
वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी
iQOO neo 6 (किंमत २३,९९९ रुपये)
वरील ब्रँड्सच्या तुलनेत भारतीयांसाठी नवखा असणारा
IQOO ब्रँडचा Neo 6 हा फोन देखील चांगल्या डिस्काउंटसह मिळत आहे. यामध्ये शक्तिशाली Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरसह दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. गेमिंग आणि जास्त वर्कलोड असणारी कामंही यावर सहज करता येतील. फोनमध्ये कॅमेरा स्पेसिफिकेशन्सही उत्तम आहेत. दरम्यान फोनची किंमत २३,९९९ रुपये इतकी आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
OnePlus 10R (किंमत २९,९९९ रुपये)
स्मार्टफोन ब्रँड्समध्ये आघाडीवर असणारा वनप्लस ब्रँडचा
OnePlus 10R देखील या लिस्टमध्ये आहे. सध्या याची किंमत २९,९९९ रुपये इतकी झाली असून याचे फीचर्स पाहता ही किंमत अगदी भारी डिल आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. तसंच OnePlus 10R मध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि OxygenOS 12 सारखे फीचर्स आहेत.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Xiaomi 12 Pro (किंमत ४२,९९९ रुपये)
या यादीतील एक महागडा फोन म्हणाल तर शाओणी कंपनीचा Xiaomi 12 Pro हा आहे. याची किंमत अधिक असली तरी फीचर्सही तसेच दमदार आहेत. अफलातून कॅमेरा सेटअप असलेला हा फोन आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट हा प्रोसेसर असून 50 मेगापिक्सलचे तीन सेन्सर कॅमेरे देण्यात आले आहेत. शाओमीच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये चांगली डिझाईन, प्रीमियम बिल्ड क्वालिटी यासह दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. बॅटरी 120W जलद चार्जिंग देते. दरम्यान आता सेलमध्ये हा फोन ४२,९९९ रुपयांना मिळणार आहे.
वाचा : 5G Smartphones : मार्केटमध्ये या ‘टॉप ५’ 5G स्मार्टफोन्सची जोरदार चर्चा, किंमत आणि फीचर्स पाहा