Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नोकियाचा सर्वात मजबूत स्मार्टफोन लाँच, वॉटरप्रूफसाठी मिळते IP69K ची रेटिंग

10

नवी दिल्लीः नोकियाने आपला नवीन फोन Nokia XR21 ला लाँच केले आहे. गेल्या आठवड्यापासून Nokia XR2 चे फीचर्स लीक होत होते. Nokia XR21 वरून कंपनीने म्हटले की, कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात मजबूत स्मार्टफोन आहे. या फोनला वॉटर रेसिस्टेंटसाठी IP69K ची रेटिंग मिळाली आहे. या फोनला कंपनी सध्या काही निवडक शहरात उपलब्ध करणार आहे.

Nokia XR21 ची किंमत

Nokia XR21 स्मार्टफोनला मिडनाइट ब्लॅक आणि पाइन ग्रिन कलर मध्ये आणले आहे. Nokia XR21 फोनला ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मध्ये आणले आहे. याची किंमत ब्रिटनमध्ये ४९९ पाउंड म्हणजेच ५१ हजार ३०० रुपये आहे. तर जर्मनी मध्ये या फोनची किंमत ५९९ यूरो म्हणजेच जवळपास ५४ हजार ३०० रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारात Nokia XR21 या फोनला लाँच करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात

Nokia XR21 ची स्पेसिफिकेशन
Nokia XR21 मध्ये ६.४९ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस LCD डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्ले वर गोरिला ग्लास विक्टसचा सपोर्ट दिला आहे. Nokia XR21 मध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 619L GPU मिळते. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. यात अँड्रॉयड १२ मिळते. Nokia XR21 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा लेन्स ८ मेगापिक्सलचा आहे. जो अल्ट्रा वाइड लेन्स आहे. नोकियाच्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. नोकियाच्या या फोनमध्ये 4800mAh ची बॅटरी दिली आहे. यासोबत 33W ची फास्ट चार्जिंग दिली आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे.

वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.