Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आता WhatsApp चॅट iPhone मधून Android मध्ये लगचेचच करता येणार ट्रान्सफर, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

9

नवी दिल्ली : Transfer Chats to iPhone : आजकाल व्हॉट्सॲप म्हणजे अतिशय महत्त्वाचं ॲप झालं आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप असतं, सर्वांना त्याची गरजही तितकीच असते. आता समजा तुम्ही तुमचा फोन बदलला किंवा ॲन्ड्रॉईड वापरत असाल आणि आयफोन विकत घेतला, तर अशामध्ये तुमचं महत्त्वाचं व्हॉट्सॲप चॅट तुम्हाला तुमच्या नवीन फोनमध्ये घ्यायचं म्हणजे फार किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया असते, पण आता व्हॉट्सॲपनं एक नवीन Transfer Chats to iPhone हे फीचर आणल्यानं ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे.

व्हॉट्सॲपसबंधित विविध अपडेट्सची माहिती देणाऱ्या WABetaInfo च्या अलीकडील अहवालानुसार, iOS 23.9.0.72 साठी WhatsApp beta ने ‘Transfer Chats to iPhone’ नावाचा एक नवीन पर्याय सादर केला आहे. जो वापरकर्त्यांना iCloud बॅकअप न वापरता नवीन iPhone वर चॅट ट्रान्सफर करण्यास मदत करु शकतो. आयक्‍लाउडवर तुमच्‍या WhatsApp चॅटचा बॅकअप घेताना तुम्‍ही तुमचा आयफोन हरवला किंवा तो रीसेट केला तर उपयोगी पडू शकतो, जर वापरकर्त्‍यांकडे मोबाईलवर चॅट डाउनलोड करण्‍यासाठी आयक्लाऊंड नसेल किंवा तुम्‍ही मोफत 5GB ओलांडल्‍या असतील तर नवीन फिचर उपयोगी पडू शकते.

वाचा : तुमच्या Android फोनमध्ये या ५ सेटिंग्स सुरु ठेवणं पडेल महाग, ऑन असतील तर आताच करा ऑफ

कसं कराल ट्रान्सफर?
तर हे फीचर वापरण्यासाठी व्हॉट्सॲप सेटिंग्जमधील ‘चॅट्स’ ऑप्शनमध्ये जा त्यानंतर ‘Transfer Chats to iPhone’ हे फीचर दिसेल. ते वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या नवीन आयफोनवर आधी WhatsApp डाउनलोड करावे लागेल, जिथे तुम्हाला चॅट्स ट्रान्सफर करायच्या आहेत, त्याच फोन नंबरची नोंदणी या नवीन व्हॉट्सॲपवर करा. त्यानंतर मग नवीन डिव्हाइसवर दाखवलेला QR कोड स्कॅन करण्यासाठी जुना फोन वापरा. कोड स्कॅन होताच तुमची परवानगी विचारुन त्यानंतर अगदी सहजरित्या तुम्हाला चॅट ट्रान्सफर करता येईल.

वाचा : पाच लघुग्रह ३२,१५२ kmph च्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने, आजचा दिवस धोक्याचा!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.