Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

IPL मुळे बॉलिवूडचे धाबे दणाणले, बड्या निर्मात्यांनी घ्यावा लागला हा मोठा निर्णय

13

क्रिकेटच्या मैदानात ‘आयपीएल’मुळे चांगलाच रंग चढला आहे. नजीकच्या दिवसांत मैदानात झालेली ‘काटे की टक्कर’ पाहता मे महिना क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अधिक रंजक असणार असं दिसतंय. याचा परिणाम बॉलिवूड सिनेमांच्या प्रदर्शनावर होताना दिसतोय. सुट्टीचे दिवस असूनही कोणत्याही बड्या स्टार कलाकाराचा सिनेमा सध्या प्रदर्शित होत नाहीय. त्यामुळे बॉलिवूडसाठी मे महिना कोरडा राहणार असून जून-जुलै महिन्यात सिनेमांची बरसात होणार आहे.
ए आर रहमान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, ऑस्कर पुरस्कार विजेत्यावर झाले गंभीर आरोप
शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ सिनेमा २ जूनला प्रदर्शित होणार असल्याची पूर्वघोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. प्रदर्शनाची तारीख जवळ येऊनसुद्धा सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झालेली नाही. तसंच सिनेमाचा ट्रेलरदेखील अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख काही आठवडे पुढे ढकलली जाईल; असा अंदाज वर्तवला जातोय. तसंच आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ या सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीखदेखील पुढे ढकलण्यात आली असून ते सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
गांधी गोडसे एक युद्ध सिनेमा फ्लॉप का झाला, राजकुमार संतोषी म्हणाले; पठाणच्या निर्मात्यांनी…
‘जून महिन्यात ‘आदिपुरुष’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘मैदान’ सारखे बिग बजेट सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. परंतु, संपूर्ण मे महिन्यात म्हणजे सुट्टीच्या दिवसांमध्ये एकही मोठ्या बजेटचा सिनेमा प्रदर्शित होत नाहीय. आयपीएल हे त्यामागचं एक कारण असू शकतं’; असं सिनेव्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. तर निर्माते गिरीश जोहर यांनी सांगितलं, ‘या सगळ्यात बॉलिवूडविश्वाचा सिनेमा प्रदर्शनाच्या नियोजनात अभाव दिसतो. एखाद्या महत्त्वपूर्ण सामन्याच्या वेळी कदाचित प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाणार नाहीत; पण संपूर्ण महिनाभर बड्या सिनेमांनी चित्रपटगृहापासून लांब राहणं सिनेव्यवसायासाठी योग्य नाही.’

* जूनमध्ये प्रदर्शित होणारे सिनेमे आणि त्यातली मुख्य अभिनेता

जवान (शाहरुख खान)

ब्लडी डॅडी (शाहिद कपूर)

आदिपुरुष (प्रभास)

मैदान (अजय देवगण)

सत्यप्रेम की कहानी (कार्तिक आर्यन)


* गेल्या दहा वर्षांत मे महिन्यात प्रदर्शित झालेले बिग बजेट सिनेमे

जयेशभाई जोरदार, धाकड, भुल भुलैया २ (२०२२)

राधे (२०२१)

स्टुडंट ऑफ द इयर २ (२०१९)

परमाणू (२०१८)

हिंदी मिडीअम (२०१७)

तनु वेड्स मनू रिटर्न, पिकू (२०१५)

हिरोपंती (२०१४)

ये जवानी है दिवानी (२०१३)

इशकजादे (२०१२)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.