Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Apple iPhone 14
आता तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर अगदी लेटेस्ट आयफोन म्हणजे iPhone 14 विकत घेऊ शकता. कारण ॲमेझॉनच्या या सेलमध्ये या आयफोनवर तगडं डिस्काउंट मिळत आहे. विशेष म्हणजे डिस्काउंट, बँक ऑफर, एक्सचेंज असं सारं वापरुन तुम्ही अगदी ४० हजारांपेक्षा कमी किंमतीत हा फोन विकत घेऊ शकता. या आयफोनमध्ये A15 Bionic हा अगदी लेटेस्ट प्रोसेसरसह सारे दमदार फीचर्स आहेत.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Samsung Galaxy M14 5G
तुम्ही सॅमसंग फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर M सिरीजमधील Samsung Galaxy M14 5G हा एक भारी ऑप्शन आहे. फोनमध्ये हा सेल तुम्ही अगदी १२,४९० रुपयांपर्यंत कमी किंमतीतही विकत घेऊ शकता. याचे फीचर्स म्हणाल तर 6000mAh ची बॅटरी आणि Exynos 1330 चाा प्रोसेसर हे दमदार फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
OnePlus Nord CE 3 Lite
काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला हा बजेट स्मार्टफोन आपली हवा करताना दिसत आहे. म्हणजे कमी किंमतीत दमदार फीचर्स ही खासियत असणारा हा फोन आणखी स्वस्तात आता मिळणार आहे. हा फोन या सेलमध्ये १८,९९९ रुपयांपर्यंत कमी किंमतीत या सेलमध्ये विकत घेता येऊ शकतो. यामध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रीपल रेअर कॅमेरा, Snapdragon 695 प्रोसेसर असे दमदार फीचर्स आहेत.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
OnePlus 11R 5G
या यादीतील आणखी एक वनप्लसचा फोन म्हणजे OnePlus 11R 5G. ५० हजारांहून अधिक किंमतीचा हा फोन या सेलमध्ये अगदी ३८,९९९ रुपयांपर्यंत विकत घेता येईल. यावर तुम्ही एक्सचेज ऑफर्सच्या मदतीने आणखी पैसेही वाचवू शकता. फोनचे फीचर्स म्हणाल तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो 120 Hz सुपर फ्ल्यूड एमोलेड डिस्प्ले सोबत येतो. याचा रिझॉल्यूशन 2772X1240 पिक्सल आहे. फोनमध्ये HDR10+ सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. याशिवाय, मायक्रो कॅमेरा दिला आहे. फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
वाचाः Solar Storm : सूर्यावरील मोठ्या धमाक्यानंतर पृथ्वीवरही पोहोचलं वादळ, लदाखमध्ये दिसला परिणाम
Realme Narzo N55
मागील महिन्यात लाँच झालेला रिअलमी कंपनीचा हा स्वस्तात मस्त फोन या सेलमध्ये अगदी १०,२४९ रुपयांपर्यंत कमी किंमतीत विकत घेता येऊ शकतो. तसंच अॅमेझॉन पे वॉलेटने पे केल्यास आणखी डिस्काउंट मिळेल. या फोनच्या फीचर्समध्ये मुख्य म्हणजे 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह मिळत असून MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे.
वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी
Vivo Y56 5G
विवो कंपनीचा Vivo Y56 5G हा देखील या यादीत आहे. १९,९९९ रुपये किंमत असणारा हा फोन १८,९९९ रुपयांना विकत घेता येईल तसंच एक्सचेंज ऑफर्सने किंमत अजूनही कमी होऊ शकते. फोनच्या फीचर्सचा विचार केल्यास फोनचा डिस्प्ले ६.५८ इंचाचा आहे. तर रॅम ८ जीबी असून १२८ जीबीचा इनबिल्ट स्टोरेज आहे. दोन रेअर कॅमेरे ५० मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल असे असून १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच बॅटरी 5000mAh इतकी आहे.
वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात
Nokia X30 5G
नोकिया कंपनीचा फोनही या यादीत असून Snapdragon 695 हा तगडा प्रोसेसर या फोनमध्ये आहे. ८जी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत ४९,९९९ रुपये असून सेलमध्ये हा फोन ३५,९९९ रुपयांपर्यंत विकत घेता येऊ शकतो. याचे खास फीचर्स म्हणाल तर ६.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह असून 4200mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह मिळत आहे.
वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!
Redmi 12C
रेडमी कंपनीचा हा फोन अगदी १० हजारांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येऊ शकतो. Redmi 12C या फोनची किंमत १३,९९९ रुपये असून हा सेलमध्ये ८,४९९ रुपयांपर्यंत कमी किंमतीत मिळू सखतो. दोन महिन्यांआधी लाँच झालेल्या या फोनमध्ये MediaTek Helio G85 5G प्रोसेसर असून ५० मेगापिक्सेलचा दमदार कॅमेरा आहे.
वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा