Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Xiaomi Sale ला सुरुवात, स्मार्टफोनपासून ते टीव्ही, लॅपटॉपर्यंत सर्वांवर दमदार सूट, १० मे शेवटची तारीख

9

नवी दिल्ली : Xiaomi Fan Days Sale: एककाळ असा होता जेव्हा दमदार कॅमेरा, रॅम, स्टोरेज असणारा स्मार्टफोन हा महागच असायचा, पण नंतर सर्वच कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजा ओळखून बजेट फोन तयार करण्यास सुरुवात केली. पण याची सुरुवात करणाऱ्या कंपन्यांतील एक म्हणजे शाओमी. शाओमी ज्याला रेडमी नावाने ही ओळखलं जातं, त्यांनी मार्केटमध्ये बजेट फोन आणण्यास सुरुवात केली. स्वस्तात मस्त फोन तयार करणारी ही कंपनी आता सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करत असून यामध्ये लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बँड, पॉवर बँक असं सारंकाही आहे. विशेष म्हणजे आता या शाओमी कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सच्या खरेदीवर दमदार सूट कंपनीने देऊ केली आहे. ४ मे पासून कंपनीचा Xiaomi Fan Days हा सेल सुरु झाला असून १० मे पर्यंत असणाऱ्या या सेलमध्ये ३८,००० पर्यंतची सूटही मिळवू शकता. तर सेलमधील डिस्काउंटबद्दलच्या काही खास गोष्टी पाहूया…या उपकरणांवर मिळतेय तगडी सूट..
Redmi A1+ स्मार्टफोन अवघ्या ५, ८४९ रुपयांना
Redmi K50i 5G स्मार्टफोन अवघ्या १९,४९९ रुपयांना
Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन अवघ्या २१,४९९ रुपयांना
Redmi Smart TV 32 HD Ready स्मार्टटीव्ही केवळ ९,४९९ रुपयांना
Redmi Smart TV X43 टीव्हीची किंमत २२,४९९ रुपये
Xiaomi Pad 5 ची किंमत सेलमध्ये २४,४९९ रुपये
Mi NoteBook Pro लॅपटॉ ४५, ९९९ रुपयांना
10000mAh ची Mi Power Bank 3i अवघ्या १,१९९ रुपयांना
Redmi Watch 2 Lite केवळ २,२२९ रुपयांना

फ्रीमध्येही प्रोडक्ट्स जिंकण्याची संधी

वरील प्रोडक्ट्सवर आणखी एक्सचेंज बोनस तुम्ही मिळवू शकता. याशिवाय कंपनीने काही खास अॅक्टिव्हिटी देखील ठेवल्या आहेत. यामध्ये ९९ रुपयांनाही काही गोष्टी खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. तसंच ग्राहक प्ले अँड विन गेम्समध्ये सामिल होऊ शकतात. यामध्ये कंपनीचे लेटेस्ट प्रोडक्ट्स जसंकी Xiaomi Trimmer 2C, Redmi Watch 2 Lite, Redmi Writing Pad फ्रीमध्ये जिंकण्याटी संधी आहे.

वाचा : WhatsApp News : सावधान! तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट कायमचं होईल बॅन, आजच ‘या’ 8 गोष्टी करणं थांबवा!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.