Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 13 अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, अशी करू शकता ऑर्डर

14

नवी दिल्लीःiPhone 13 लाँचिंग झाल्यापासून नेहमीच ट्रेंड मध्ये राहिलेला आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही नवीन डिस्काउंट संबंधी माहिती देत आहोत. याच्या मदतीने तुम्ही या फोनला स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. परंतु, खरेदी करण्याआधी चुकूनही काही चुका करू नका. जाणून घ्या या फोनवर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफर्स संबंधी.

APPLE iPhone 13 (128GB) ला तुम्ही सहज फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या स्मार्टफोनची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. याला तुम्ही १५ टक्के डिस्काउंट नंतर ५८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहे. SBI Credit Card वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळतो. EMI Transaction वर तुम्हाला असाच डिस्काउंट मिळू शकतो.

वाचाः Amazon Great Summer Sale ला सुरुवात, Apple, Oneplus सह या ८ फोन्सवर बंपर डिस्काउंट

Exchange Offer अंतर्गत तुम्हाला वेगळा डिस्काउंट मिळू शकतो. जर तुम्हाला जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत करायचा असेल तर तुम्ही यावर २६ हजार २५० रुपयाची सूट मिळवू शकता. परंतु, इतका डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनची कंडीशन ठीक असायला हवी. तसेच ही सूट फोनच्या मॉडलवर डिपेंड करते.

वाचाः Flipkart-Amazon च्या सेलमध्ये ८००० पेक्षा कमी किंमतीतही स्मार्टफोन्स उपलब्ध, पाहा टॉप ४

हा फोन आज ऑर्डर केल्यास उद्यापर्यंत डिलिव्हर केला जाईल. स्पेसिफिकेशनवरून तुम्हाला कोणतीही तक्रार करायची संधी नाही. या फोनमध्ये 6.1 Inch Super Retina XDR Display दिला आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सुद्धा दिला जात आहे. याचा प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा दिला आहे. फोनमध्ये 12MP Front Camera सुद्धा दिला जात आहे. प्रोसेसरवरून तुम्हाला कोणतीही तक्रार करायची संधी नाही. या फोनमध्ये A15 Bionic Chip Processor मिळते. आयफोन १३ नेहमी ट्रेंड मध्ये राहणार आहे. तुम्हाला जर हा फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

वाचाः आता Gmail ही देणार Blue Tick, कोणत्या युजर्सना मिळणार? काय असतील फायदे?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.