Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दमदार बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत Motorola Edge 40 फोन लाँच

10

नवी दिल्लीः Motorola ने मिडल ईस्ट, लॅटिन अमेरिका आणि आशिया पॅसिफिक रीजनमध्ये आपला नवीन फोन लाँच केला आहे. Motorola Edge 40 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8020 SoC आणि 8GB LPDDR4X रॅम दिली आहे. यासोबत 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि एचडीआर10+ सर्टिफिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. फोनमध्ये 68W TurboPower वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट सोबत 4400mAh ची बॅटरी दिली आहे.

Motorola Edge 40 ची किंमत
Motorola Edge 40 ची किंमत यूरोपिय बाजारात EUR 599.99 जवळपास ५४ हजार रुपये किंमतीत लाँच केला आहे. या फोनला एक्लिप्स ब्लॅक, लूनर ब्लू आणि नेबुला ग्रीन कलर मध्ये खरेदी करता येऊ शकतो. फोनला ८ जीबी रॅम आणइ २५६ जीबी स्टोरेज मध्ये आणले आहे. आगामी दिवसात या फोनला यूरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः वाचा : घरी आणा आधुनिक फीचर्ससह दमदार असा QLED TV, Amazon च्या सेलमध्ये मिळतेय तगडी सूट

Motorola Edge 40 चे फीचर्स
हा फोन ड्युअल सीम वर काम करतो. यात अँड्रॉयड १३ दिले आहे. यात 144Hz रिफ्रेश रेट सोबत ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (2400 x 1080 पिक्सल) पोलेड स्क्रीन दिली आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 8020 SoC सोबत येतो. यात 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात OIS सपोर्टचा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि मायक्रो व्हिजनचा १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी शूटर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी ड्युअल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.२, जीपीएस, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. फोन 68W TurboPower वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सोबत 4500mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः WhatsApp : तुमचं व्हॉट्सॲपवरचा ‘बेस्ट फ्रेंड’ कोण आहे? या सोप्या ट्रिकने जाणून घेऊ शकता

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.