Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

२०२३ मधील टॉप फीचर्सचे स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

11

नवी दिल्लीःAffordable smartphones under Rs 15000: तुमचे बजेट जर १५ हजार रुपयांपर्यंत असेल तर मार्केटमध्ये एकापेक्षा एक भारी फीचर्सचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता कमी किंमतीत 5G फोन उपलब्ध होत आहेत. परंतु, या बजेट मध्ये शोधणे जरा अवघड आहे. १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत एक 5G फोन तोही खास फीचर्सचा असायला हवा. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी खास फीचर्सचे २०२३ मधील १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील फोनसंबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

Realme 10 4G
Realme 10 4G 6.4 इंचाच्या Super AMOLED डिस्प्ले सोबत येतो. याचे रिजॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. यात 90Hz ची रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. फोन मध्ये Mediatek MT8781 Helio G99 (6nm) ऑक्टा कोर प्रोसेसर दिले आहे. जे 4GB RAM आणि 64GB स्टोरेज दिले आहे. या फोनच्या मागे 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर चा 2 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी, फ्रंट मध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये 33W चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे.

Samsung Galaxy F14 5G
Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.6 इंचाचा PLS LCD डिस्प्ले दिला आहे. याचे रिजॉल्यूशन 1080 x 2408 पिक्सल आहे. तसेच याचा रिफ्रेश रेट 90Hz दिला आहे. यात ऑक्टा कोर Exynos 1330 (5nm) प्रोसेसर दिले आहे. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज दिले आहे. फोनच्या रियर मध्ये 50 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. यात 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात 25W चार्जिंग सपोर्ट सोबत 6000mAh ची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.

वाचा : घरी आणा आधुनिक फीचर्ससह दमदार असा QLED TV, Amazon च्या सेलमध्ये मिळतेय तगडी सूट


Realme C55

Realme C55 एक बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन आहे. जो मेडिएटेक हीलियो G88 प्रोसेसरवर काम करतो. यात 6.72 इंचाची IPS LCD डिस्प्ले दिली आहे. जी 90Hz च्या रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो सोबत येते. फोनच्या मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिले आहे. फ्रंट मध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये 33W चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे. Realme C55 च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः दमदार बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत Motorola Edge 40 फोन लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.