Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तुमचा ओरिजनल प्रोफाइल फोटो ठेवा
तुम्हाला इन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्स हवे असतील तर तुम्ही तुमचा स्वत:चा ओरिजनल फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवाव. जर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये ओरिजनल
फोटो टाकला नाही तर इतर इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना वाटू शकते की ते अकाउंट फेक असू शकते. त्यामुळे कधीही इन्स्टाग्रामवर तुमचा ओरिजनल फोटोज प्रोफाईल फोटो म्हणून ठेवावा.
वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक
यूजरनेम युनिकपण सोपंही असावं
जर तुम्ही इंस्टाग्रामचे सक्रिय वापरकर्ते असाल, म्हणजेच दररोज इन्स्टाग्रामावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर विचित्र नावांच्या प्रोफाइल दिसत असतील. ही प्रोफाइल नावे मनोरंजक वाटू शकतात परंतु इन्स्टाग्रामवर अशा नावांसह प्रोफाइल शोधणे अधिक कठीण आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला असे प्रोफाइल नाव ठेवावे लागेल, जे वापरकर्ते सहजपणे शोधू शकतील आणि ते काहीप्रमाणात युनिकही असेल.
वाचा : Amazon Great Summer Sale ला आजपासून सुरुवात, Apple, Oneplus सह या ८ फोन्सवर बंपर डिस्काउंट
बिजनेस अकाउंट वापरा
वापरकर्त्यांना Instagram वर जर फॉलोवर्स वाढवायचे असतील तर स्वत:च्या अकाउंटची असणाऱ्या, नव्याने येणाऱ्या फॉलोवर्सची माहिती मिळवण्यासाठी आपलं अकाउंट बिजनेस अकाउंट म्हणून चेंस करावं लागेल. बिजनेस अकाउंट सामान्य खात्यापेक्षा जास्त लांबपर्यंत पोहोचू शकतो. बिजनेस अकाउंटवर अधिकचे अनेक फीचर्स मिळतात.
वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा
चांगला कंटेंट
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फोटो किंवा रिल्स जे काही पोस्ट करत असाल त्याचा कंटेट भारी असावा. त्यामुळे Instagram वर तुमचा कंटेट जितका दमदार असेल तितकी त्याची पोहोच जास्त असेल. अशा परिस्थितीत, आपण मनोरंजक कंटेट तयार केला पाहिजे. कंटेट जितका चांगला असेल तितक्या वेगाने तुमचे फॉलोअर्स वाढतील.
वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!
अट्रॅक्टिव्ह कॅप्शन
आता कंटेट चांगलाच असायला हवा पण सोबतच त्याला तुम्ही देणारं कॅप्शनही चांगलं हवं. कारण पोस्टचं कॅप्शन आकर्षक असल्यावर अधिकजण क्लिक करतात. अनेक वेळा कॅप्शनमध्ये लिहिलेल्या दोन ओळी वापरकर्त्यांना खूप आकर्षित करतात. याच्या मदतीने ते तुमचे अकाउंट फॉलो करू शकतात. इन्स्टाग्रामवर, वापरकर्त्यांना कॅप्शन लिहिण्यासाठी २२०० अक्षरांचा पर्याय मिळतो. त्यामुळे या सर्वाचा वापर करुन योग्यप्रकारे कॅप्शन लिहावं.
वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात