Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio Recharge : आता वर्षभर रिचार्जचं टेन्शनंच नाही! दररोज 2GB डेटाही मिळणार, जिओची भन्नाट ऑफर

14

नवी दिल्ली :Reliance Jio : सध्या भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओकंपनी बऱ्यापैकी आघाडीवर आहे. याचं कारण सध्या फक्त जिओ आणि एअरटेलच ५जी ऑफर करत असून जिओ अधिक ठिकाणी ५जी सेवा देत आहे. तसंच त्यांचे रिचार्जही विविध प्रकारचे असल्याने ग्राहकांना अधिक चॉईस मिळते. दरम्यान जिओही ग्राहक वाढवण्यासाठी त्यांच्या गरजा ओळखून नवनवीन रिचार्ज प्लान घेऊन येतच आहे. दरम्यान काहींना सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल तर अशा ग्राहकांसाठी वर्षभराच्या वैधतेसह काही प्रीपेड योजना आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ…यासर्व प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस प्लान आणि इंटरनेट डेटा ऑफर केला जातो. यातील प्रसिद्ध रिचार्ज म्हणदे २,८७९ रुपयांचा. हा Jio प्रीपेड प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसह ऑफर केला जातो. Jio च्या या प्रीपेड पॅकच्या किंमती आणि सर्व ऑफर्सचा विचार केला तर या २,८७९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना एक वर्षासाठी रिचार्जचे टेन्शन राहणार नाही. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ७३० जीबी डेटाचा फायदा घेता येईल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps इतका कमी होतो. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. या रिचार्ज प्लॅनद्वारे ग्राहक देशभरात स्थानिक आणि एसटीडी व्हॉईस कॉल करू शकतात. याशिवाय पॅकमध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. तसंच या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 5G डेटा चालवणारे ग्राहक या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G इंटरनेट चालवू शकतात.

वाचा : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अणुबॉम्बइतकाच धोकादायक! अब्जाधीश व्यावसायिक वॉरेन बफे म्हणाले…

आणखी दोन रिचार्जचाही ऑप्शन
याशिवाय, Jio कडे २,९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील आहे जो ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो वरील फायद्यांसह याचं दररोजचं इंटरनेट हे २.५ जीबी इतकं आहे. तर २,५४५ रुपयांच्या प्लॅनची वैधता ३३६ दिवस असून त्यात दररोज १.५ जीबी डेटा मिळतो.

वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.