Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्क्रीन साईज
टीव्ही विकत घेताना, त्याच्या स्क्रीनचा आकार ही एक फार महत्त्वाची गोष्ट असून आपण सारेच ती पाहतो. पण असंही होऊ शकतं की तुमची निवड आणि तुमच्या घराचा आकार एकमेकांच्या विरुद्ध असेल. म्हणजे तुमच्या हॉल किंवा बेडरुममध्ये जिथेही ठेवायचा आहे, त्या खोलीच्या अनुरुप आकाराचा टीव्ही घ्यावा. कारण खोली छोटी आणि टीव्हीची साईज मोठी झाल्यास तुम्हाला चांगला अनुभव येणार नाही.
वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक
कलर वॉल्युम
कलर वॉल्युम म्हणजे काय तर टीव्हीच्या सर्व ल्युमिनन्स स्तरांवर अचूक रंग तयार करण्याची टीव्हीची क्षमता. कलर व्हॉल्यूम जितका जास्त असेल तितका टीव्ही अधिक चांगले रंग देऊ शकतो. कलर व्हॉल्यूमचे मोजमाप हा UHD टीव्हीच्या विविध प्रकाश परिस्थितींमध्ये टीव्ही कसा कार्य करतो हे लक्षात घेऊन, पाहण्याचा अनुभव कसा आहे हे पाहण्याचा एक मार्ग आहे. कलर व्हॉल्यूम महत्त्वाचा आहे कारण जर एखादे चित्र टीव्हीच्या कमाल ल्युमिनन्सपेक्षा जास्त असेल, तर ते फिकट झालेले दिसेल, ज्यामुळे पाहण्याच्या अनुभवाची गुणवत्ता खराब होईल.
वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा
एचडीआर
HDR म्हणजेच हाय डायनॅमिक रेंज तंत्रज्ञान हे टीव्हीवर येणाऱ्या चित्रांमध्ये अधिक भारी रंग, ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट टाकते. गोरे अधिक पांढरे, काळे काळे आणि इतर रंग अधिक खोल दिसण्यासाठी HDR ची सुरुवात केली आहे. HDR मुळे टीव्हीवर एक भारी चित्र तयार होते आणि एक भारी अनुभव येतो.
वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!
रिफ्रेश रेट
स्क्रीनवरील चित्र एका सेकंदात किती वेळा रिफ्रेश होते याला टीव्हीचा रिफ्रेश रेट म्हणतात. हे हर्ट्झमध्ये मोजले जाते. हर्ट्ज जितके जास्त तितके चित्र नितळ आणि सुंदर दिसते. साधारण टीव्हीमध्ये 60 Hz तर उच्च श्रेणीतील टीव्हींमध्ये 120 Hz ते 144 Hz इतका रिफ्रेश रेट असतो. उच्च रीफ्रेश रेट टीव्ही कमीत कमी मोशन ब्लरसह स्पष्ट व्हिज्युअल वितरीत करतात, जर तुम्ही गेमर असाल किंवा तुम्हाला अॅक्शन चित्रपट पाहणे आवडत असेल, तर उच्च रिफ्रेश रेट तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे.
वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात
एचडीएमआय
HDMI म्हणजेच हाय डेफिनिशन मल्टीमीडिया इंटरफेस म्हणजे सोप्या शब्दात काय तर तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनचा ज्यासाठीही वापर कराल ती गोष्टी एचडीएमआय केबलने जोडली जाते. म्हणजेच तुम्ही डिश टीव्हीवर काही पाहणार असाल किंवा गेमिंग कन्सोल जॉईन करुन गेम खेळणार असाल हे सारं HDMI ने केलं जातं. दरम्यान चांगल्या गुणवत्तेच्या HDMI केबल्सने अधिक फास्ट आणि चांगला डेटा ट्रान्सफर होतो. टीव्ही ज्या प्रकारे त्याचे HDMI आणि इतर कनेक्शन हाताळतो ते त्याच्या सेटअपवर अवलंबून असते. याशिवाय, आजकाल ड्युअल बँड वाय-फाय टीव्ही येऊ लागले आहेत, त्यामुळे हे ड्युअल बँड टीव्हीच खरेदी करण्यासाठी सध्या बेस्ट आहेत.
वाचा : समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक