Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
universal travel pass service: आता एका क्लिकवर मिळवा रेल्वे प्रवासासाठी ‘ई-पास’; राज्य सरकारने प्रसिद्ध केली ‘ही’ लिंक
हायलाइट्स:
- लोकल प्रवासासाठी ई-पास सेवा सुरू.
- राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हेल पास सिस्टम विकसित केली आहे.
- त्यासाठी राज्य सरकारने उपलब्ध केली वेबलिंक.
लशीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी सहज ई-पास उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने https:/ / epassmsdma.mahait.org ur वेबलिंक उपलब्ध केली आहे. ही बेवसाईट सुरू झाली असून याद्वारे सर्वसामान्य ई-पास मिळवू शकणार आहेत. ही वेबलिंक सर्वच ब्राउझर्सवर उघडू शकणार आहे. नागरिकांनी या बेवलिंकवरून ई-पास डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची आहे.
क्लिक करा आणि वाचा- राहुल गांधीना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्याने ट्विटरवर केला ‘हा’ बदल
असा मिळवा मासिक पास
जेव्हा तुम्ही मासिक पास काढण्यासाठी रेल्वे स्थानकात जाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमझ्ये सेव्ह केलेला ई-पास तिकिट खिडकीवर दाखवावा लागणार आहे. त्यानंतर त्या आधारे तुम्हाला मासिक पास मिळेल. या पद्धतीत ऑफलाइन पडताळणी करण्याची आवश्यकता असणार नाही. एकदा का ऑनलाईन ई-पास मिळवला की मग लशीचे दोन डोस घेऊन १४ दिवस उलटून गेले आहेत अशी व्यक्ती मुंबईतील रेल्वे प्रवास करू शकणार आहे. ज्या व्यक्तीला पास हवा आहे अशाची लशीबाबतची पडताळणी ही आपोआपच होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- पंतप्रधान मोदींवर इतकी जहरी टीका…..; आमदार प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक
या लिंकमुळे वेगळी पडताळणी करण्याची आवश्यकता नसल्याचेही राज्य सरकारने जाहीर केली आहे. लशीचे दोन डोस घेतली आहे मात्र १४ दिवस झालेले नाहीत अशा व्यक्तीने पाससाठी प्रयत्न केले तरी देखील त्यांना त्यांचा पास १४ दिवस झाल्यानंतर मिळणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी राष्ट्रपतींनी केंद्राला विचारणा करावी’