Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google I/O 2023 मध्ये गुगलच्या मोठ्या घोषणा, लाँच केले नवनवीन प्रोडक्ट्स, कार्यक्रमातील १० महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर

26

Google कंपनीने त्यांच्या Google I/O 2023 या भव्य कार्यक्रमात कितीतरी महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसंच गुगलचा पिक्सल ७ए, गुगल टॅब्लेट असे बरेच लेटेस्ट प्रोडक्ट्सही यावेळी लाँच केले गेले. कंपनीने एकूण तीन नवीन Pixel डिव्हाइसेस लाँच केले AI तंत्रज्ञानाविषयी नवनवीन घोषणा देखील यावेळी केल्या. या 2-तासांच्या इव्हेंटचे जवळजवळ पहिले दीड तास Google च्या AI योजनांबद्दल होते. कंपनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये AI ला कसं सामावून घेत आहे, हे सारं यावेळी दिसून आलं. तसंच त्सयानंतर विविध लेटेस्ट उपकरणं कंपनीने यावेळी लाँच देखील केली. तर Google च्या 2023 च्या या Google I/O 2023 या सर्वात मोठ्या इव्हेंटमधील १० सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा कोणत्या ते पाहूया…

Google नं लाँच केला पहिला फोल्डेबल फोन

Google ने Pixel Fold या फोनसह फोल्डेबल कॅटेगरीतील आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला.तर या कार्यक्रमाचं हा मुख्य आकर्षण ठरला. Google च्या या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये हायएंड Pixel 7 Pro सारखीच Tensor G2 चिप आहे. डिझाईननुसार, ते 7.6-इंचाचा डिस्प्ले पुस्तकाप्रमाणे उघडतो आणि 5.8-इंचाचा बाह्य डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन आता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल आणि जूनमध्ये आल्यावर त्याची $1,799 (अंदाचे १,४८,००० रुपये) मध्ये विक्री होईल. Google ने भारतात Pixel Fold लाँच केलेला नाही.
​वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

​Google Pixel 7a एक मिड बजेट फोन लाँच

google-pixel-7a-

Google ने Pixel 7A हा मिडरेंजमधील ए-सिरीज लाइनअपमधील गुगलचा फोन आहे.हा फोन पिक्सेल 7 प्रमाणेच Google च्या Tensor G2 चिपद्वारे समर्थित आहे. यात 6.1-इंचाचा 1080p डिस्प्ले आहे जो 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट देतो. तर एकीकडे हा एक चांगला मिड रेंज पर्याय असून या फोनमुळे याचाच जुना मॉडेल 6A ची किंमतही कमी झालेली आहे.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Google Pixel Tablet

google-pixel-tablet

Google द्वारे तयार केलेला हा पहिला टॅबलेट असून हा Pixel टॅब्लेट ११ इंचाचा आहे. याची किंमत $499 (अंदाजे ४१,००० रुपये) अशी Pixel 7a च्या जवळपास आहे. या टॅबलेटमध्ये मॅग्नेट चार्जिंग दिल्यामुळे फोनचे फीचर्स आणखी सुधारले असून स्पीकर आणखी तगडे दिले आहेत. पिक्सेल टॅब्लेट हा Google द्वारे तयार केलेला पहिला टॅब्लेट असून गुगलच्या टॅब्लेटची पूर्वीची Nexus मालिका LG ने बनवली होती

​वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Google सर्च मध्येही आता AI ची पावर

google-ai-

आता गुगलचं सर्ज इंजिन देखील AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने सक्षम आहे गुगल सर्चला जनरेटिव्ह AI सह एक प्रमुख अपडेट मिळत आहे, तेच तंत्रज्ञान जे ChatGPT ला शक्ती देते. यात AI स्नॅपशॉट नावाचे फीचर असेल ज्यामध्ये एकदा वापरकर्त्यांनी शोध जनरेटिव्ह एक्सपिरियन्स (SGE) नावाच्या नवीन फीचर्सची निवड केली की, तर त्यांना फोन देणारे सजेशन आणखी वाढणार आहेत.

​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Google Bard आता प्रत्येकासाठी उपलब्ध

google-bard-

Google ने घोषणा केली आहे की त्यांचा ChatGPT सारखा AI-शक्ती असणारा चॅटबॉट आता प्रत्येकासाठी उपलब्ध होत आहे. कंपनीने भारतासह १८० देशांमध्ये प्रतीक्षा यादी टाकली आहे. पण चॅटबॉट अद्याप बीटामध्ये आहे. Google अनेक नवीन फीचर्स देखील जोडत आहे, जसे की जपानी आणि कोरियन भाषांचा सपोर्ट Google डॉक्स अपडेट्स इत्यादी.

​वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक

Android 14 मध्ये AI टेक्नोलॉजी अधिक

android-14-ai-

Google ने घोषणा केली आहे की ते Android 14 मध्ये नवीन AI-शक्तीवर चालणारे फीचर्सआणत आहे. ​Android 14 संबधित मोबाइल OS ची नवीनतम आवृत्ती आहे. यापैकी एक फीचर म्हणजे मॅजिक कम्पोज. तुम्हाला आलेले मेसेज तुमचे रिप्लाय सारंकाही स्टोअर होईल. त्यानंतर युजर्सना वापरकर्त्यांना AI ने सुचवलेल्या प्रतिसादांचा वापर करून मजकूरांना उत्तर देण्याची पावर मिळणार आहे.

​वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा

Google Home App आणखी अपडेटेड

google-home-app-

पुन्हा नव्याने Google Home अॅप डिझाइन केला गेला आहे. लवकरच हे अपडेटेड व्हर्जन दिसणार आहे. दरम्यान हे अॅप काही मोठ्या सुधारणांसह येत असून यात एक चांगला युजर इंटरफेस, नवीन फीचर्स आणि नवीन डिव्हाइस प्रकारांना सपोर हे सगळं समाविष्ट आहे.

​​वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

Google Photos मध्ये AI पावर असणारं मॅजिक एडिटर

google-photos-ai-

मॅजिक एडिटर हे मॅजिक इरेजरचे अपग्रेडे व्हर्जन आहे. हे एआय टूल तुम्हाला नको असलेल्या फोटोंमधील घटक हटवण्यासाठी फारच उपयुक्त आहे. मॅजिक एडिटरमुळे वापरकर्त्यांना नको असलेल्या फोटोतील गोष्टी मार्क करुन इरेस करता येतेत. या वर्षाच्या अखेरीस Google Photos वर येत आहे.

​वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात

Google चं वर्कस्पेससाठी Duet AI सादर

google-duet-ai-

Google गेल्या काही आठवड्यांपासून वापरकर्त्यांना Gmail आणि गुगल डॉक्ससंबधित देणाऱ्या फीचर्सची चर्चा सुरु आहे. यानंतर आता Generative AI आता Sheets, Slides आणि Meet वर नवीन नावाने येत आहे. Duet AI for Google Workspace, Gmail, Google Docs आणि Slides मध्ये, वापरकर्त्यांना एक Duet AI साइड पॅनेल मिळेल, ज्याला “sidekick” म्हटलं जातं. त्यामुळे आता ऑफिससंबधित कामांमध्ये AI ची मदत आणखी वाढेल.

वाचा : समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक

​Google कडून Adobe च्या Firefly AI इमेज जनरेटरला Bard मध्ये केलं जाणार समाविष्ट

google-adobe-firefly-ai-bard-

Adobe आणि Google ने 2023 I/O कार्यक्रमादरम्यान संयुक्तपणे घोषणा केली की Firefly आणि Express ग्राफिक्स संच दोन्ही लवकरच Bard मध्ये समाविष्ट केले जातील, ज्यामुळे वापरकर्त्यांना चॅटबॉटच्या कमांड लाइनवरून थेट AI इमेजच जनरेट, एडिट आणि शेअर करता येतील. कंपनीच्या माहितीनुसार, वापरकर्ते फायरफ्लायसह एक इमेज तयार करण्यास सक्षम असतील, नंतर Adobe Express सब्सक्रिप्शन वापरावे लागेल.

वाचाः WhatsApp Tricks: व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढणार, फक्त या ट्रिक्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.