Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यंदाच्या Mother’s Day 2023 निमित्त आईला करुन द्या वर्षभरासाठीचा रिचार्ज, कोणती कंपनी देतेय बेस्ट डिल?

12

Special Recharge with 365 days Validity : यंदा मदर्स डे (Mother’s Day 2023) रविवारी म्हणजेच १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे. दरम्यान या मदर्स डे निमित्त तुम्ही आईला वेगवेगळे गिफ्ट देऊ शकता. पण सध्याच्या डिजीटल युगात वर्षभरासाठीचा मोबाईल रिचार्ज करुन देणं, हे देखील एक भारी गिफ्ट ठरु शकतं. तर वर्षभर म्हणजेच ३६५ दिवसांच्या वैधतेच्या काही रिचार्ज योजना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सध्या मार्केटमधील ​आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असणाऱ्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या सर्वांकडे ३६५ दिवसांच्या वैधतेसह विविध रिचार्ज योजना आहेत. प्रत्येकजण एकापेक्षा एक ऑफर देत असून ३६५ दिवसांच्या वैधतेसह सर्वोत्तम Airtel, Vi, आणि Jio रिचार्ज प्लानवर एक नजर टाकूया…

रिलायन्स जिओचा २,८७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

तर या यादीत सर्वात आधी पाहू सध्याची आघाडीची कंपनी जिओचे रिचार्ज. जिओचा ​२,८७९ रुपयांच्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनची वैधता ३६५. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ७३० जीबी डेटाचा फायदा घेता येईल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps इतका कमी होतो. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. या रिचार्ज प्लॅनद्वारे ग्राहक देशभरात स्थानिक आणि एसटीडी व्हॉईस कॉल करू शकतात. याशिवाय पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 5G डेटा चालवणारे ग्राहक या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G इंटरनेट चालवू शकतात.

वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

जिओचा ​२,९९९ रुपयांचा प्लान

जिओचा ​२,९९९ रुपयांचा प्लान

याशिवाय, Jio कडे आणखी एक दमदार रिचार्ज प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येत आहे. २,९९९ रुपये इतकी या प्रीपेड प्लानची किंमत आहे. २८७९ रुपयांच्या रिचार्जप्रमाणे सर्वच फायदे या रिचार्जमध्ये असून थोडे अधिक पैसे देऊन दर दिवसासाठी २ जीबीच्या जागी २.५जीबी इतका डाटा ग्राहकांना मिळणार आहे.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो​

​एअरटेलचा १,७९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

​एअरटेलचा १,७९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओप्रमाणे ५जी नेटवर्क सुविधा देणारा एअरटेल हा एक नेटवर्क ब्रँड आहे. एअरटेलही अगदी परवडणाऱ्या किंमतीत ३६५ दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज घेऊन आला आहे. या प्लानची किंमत १,७९९ रुपये आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३६०० एसएमएस आणि २४ जीबी एकूण ५जी इंटरनेट डेटा संपूर्ण प्लॅनच्या कालावधीत मिळतो. रिचार्ज पॅकसह सदस्यांना 3 महिन्यांसाठी अपोलो 24×7 सर्कल सबस्क्रिप्शन, FASTag वर १०० रुपयांची कॅशबॅक, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचा मोफत प्रवेश यांसारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

​वाचा : मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक

३,०९९ रुपयांचा वोडाफोन-आयडियाचा रिचार्ज

३,०९९ रुपयांचा वोडाफोन-आयडियाचा रिचार्ज

१,७९९ रुपयांशिवाय २,८९९ आणि २,९९९ रुपयांचे रिचार्ज प्लानही ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह वोडाफोन-आयडिया देत आहे. पण Vi कडून ३,०९९ रुपयांचा रिचार्ज सर्वात महाग असून ३६५ दिवसांची वैधता यात आहे. यात 2GB डेली डेटा, १०० SMS/दिवसाला आणि संपूर्ण भारतातील कोणत्याही ऑपरेटरला पूर्णपणे अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करतो. विशेष म्हणजे डिस्ने प्लस हॉटस्टार आणि लाइव्ह स्पोर्टिंग इव्हेंट्स स्ट्रीम करण्यासाठी ग्राहकांना 1 वर्षाचं डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देखील यात आहे.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​१,७९९ रुपयांचा वोडाफोन-आयडियाचा रिचार्ज

​१,७९९ रुपयांचा वोडाफोन-आयडियाचा रिचार्ज

या यादीत वोडाफोन-आयडिया ही कंपनी केवळ १,७९९ रुपयांमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. या प्लानमध्ये Vi ग्राहकांना मर्यादित 24GB डेटा, एकूण ३६०० SMS आणि पूर्णपणे अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देत आहे. या प्लानमध्ये समाविष्ट असलेल्या ‘Vi movies and TV’ अॅपद्वारे वापरकर्त्यांना मोफत चित्रपट आणि शोचा आनंद घेता येईल. शिवाय, एकदा डेटा संपल्यानंतर, डेटा ५० पैसे/MB दराने ग्राहकांना पैसे मोजावे लागतील.

​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

​3,359 रुपयांचा एअरटेलचा रिचार्ज प्लान

3359-

एअरटेल १,७९९ सह २,९९९ रुपयांचा प्लानही ऑफर करत असून यामध्ये सर्वात महागडा रिचार्ज म्हणजे 3,359 रुपयांचा आहे. Airtel या रिचार्ज प्लानमध्ये अनेक OTT फायदे आहेत ज्यात प्रत्येकी ४९९ किमतीच्या Disney Plus Hotstar Mobile आणि Amazon Prime Mobile Edition चे एक वर्षाचे सदस्यत्व समाविष्ट आहे. त्याशिवाय, या ३६५ दिवसांच्या योजनेत भारतभरातील कोणत्याही ऑपरेटरला अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दिवसाचा 2.5GB 5G डेटा आणि दिवसाला १०० SMS मिळतील. तसंच यामध्ये विंक म्युझिकचे सदस्यत्व, ३ महिन्यांचे अपोलो 24×7 सर्कल आणि मोफत हेलोट्यून्सचा प्रवेश या ऑफर्सही आहेत.

वाचा : आधार कार्डवरचं नाव/पत्ता बदलायचा आहे? घरबसल्या करु शकता, फक्त या १० स्टेप्स कराव्या लागतील फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.