Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi Phone Discount : १०८ मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा, फोनमध्ये एकूण ५ कॅमेरे, किंमत १५००० पेक्षा कमी
Xiaomi phone Redmi 11s: आजकाल डिजीटल कॅमेरा किंवा डीएलएलआर अधिक कोणी वापरत नाही, घरगुती वापरासाठी आपल्या स्मार्टफोनचा कॅमेराच अधिकजण वापरत असतात. त्यामुळे नवा फोन खरेदी करताना फोनचा कॅमेरा कसा आहे किती मेगापिक्सल आहे, हे अधिक पाहिलं जातं. आता जर तुम्हीली कॅमेऱ्याच्या वापराच्या दृष्टीने फोन पाहत असाल तर शाओमी कंपनी एक दमदार कॅमेरा असणारा फोन अगदी मोठ्या डिस्काउंटवर मिळत आहे. Xiaomi Redmi Note 11S हा १०८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप असणारा फोनवर मोठी सूट मिळत आहे.
तर शाओमी कंपनीचा हा रेडमी नोट 11S खास कॅमेऱ्यासाठी ओळखला जात आहे. या फोनच्या रेअर पॅनलला १०८ मेगापिक्सलचा दमदार क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. दरम्यान मागे चार कॅमेरे असल्याने पुढील सेल्फी कॅमेरा पकडून एकूण ५ कॅमेरे या फोनमध्ये देण्यात आले आहेत. कॅमेऱ्याशिवाय फोनची बॅटरी आणि इतर फीचर्सही भारी आहेत. विशेष म्हणजे हा फोन आता मोठ्या डिस्काउंटअंडर मिळत आहे.
स्वस्तात कसा घ्याल विकत?
Xiaomi phone Redmi 11s 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह मिळत आहे. हा फोनचा टॉप व्हेरियंट असून यावर चांगलं डिस्काउंट आहे. याची किंमत भारतात २०,९९९ रुपये झाली असून फ्लिपकार्टवर अतिरिक्त २२ टक्के डिस्काउंटसह हा फोन १६,१९० रुपयांना मिळत आहे. तसंच HDFC बँक क्रेडिट कार्डने EMI वर फोन विकत घेतल्यास १२५० रुपये आणखी सूट मिळू शकणार आहे. तसंच Flipkar Axis Bank Card ने फोन विकत घेतल्यास ५ टक्के अधिक कॅशबॅक मिळेल. हा फोन नो-कॉस्ट EMI वर विकत घेण्याची संधीही आहे.
Redmi 11s चे स्पेसिफिकेशन्स
वर सांगितल्याप्रमाणे फोनमध्ये १०८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह दमदार क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. दरम्यान मागे चार कॅमेरे असल्याने पुढील सेल्फी कॅमेरा पकडून एकूण ५ कॅमेरे या फोनमध्ये आहेत. तसंच ६.४३ इंचेसचा AMOLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. याशिवाय प्रोसेसर म्हणाल तर MediaTek Helio G96 हा असून 5000mAh ची तगडी बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह दिली गेली आहे.
वाचाः WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपवर डिलीट मेसेजस ही पाहता येणार, वाचा कसं?