Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सीबीएसई दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि इतर तपशील आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी निकालाची प्रत डाउनलोड करा आणि निकालपत्रात दिलेली इतर माहिती देखील तपासा. त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्या.
यंदा सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या. इयत्ता दहावीची परीक्षा २१ मार्च रोजी संपली आणि १२वीच्या परीक्षा ५ एप्रिलपर्यंत चालल्या. यावेळी एकूण३८,८३,७१० विद्यार्थी सीबीएसई परीक्षेत बसले. त्यापैकी दहावीचे २१,८६,९४० आणि बारावीचे १६,९६, ७७० विद्यार्थी आहेत. विद्यार्थीअधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त थर्ड पार्टी वेबसाइटवरून देखील निकाल डाउनलोड करू शकतात.
CBSE 10th, 12th Result: येथे तपासा
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर, दहावी-बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील भरुन सबमिट करा.
निकाल समोर स्क्रिनवर दिसेल
दहावी-बारावीच्या निकालाची प्रत डाउनलोड करा.