Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Oppo स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी, तुमचा जुना फोनही होणार एकदम नवा, लेटेस्ट अपडेट मार्केटमध्ये
लिस्टमध्ये A77 आणि A57 नी ॲड
ओप्पो कंपनीनेा मागील वर्षी ऑगस्टमध्ये जागतिक स्तरावर आपल्या स्मार्टफोन्ससाठी Android 13 बेस्ड ColorOS 13 समोर आणला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये भारतात F21s Pro 5G, F19s, F19, F19 Pro, A77s या मॉडेल्ससाठी ColorOS 13 बीटा रोल आउट म्हणदेच जारी केला. ज्यानंतर आता कंपनीने लिस्टमध्ये A77 आणि A57 हे दोन मॉडेल्सही ॲड केले आहेत. २७ मेपासून हा अपडेट या फोन्समध्ये येणार आहे.
कोणकोणत्या मॉडेल्ससाठी आहे हा अपडेट?
या यादीत आधीपासून ओप्पोचे FindX2, Reno8 Pro 5G, Reno8 5G, Reno7 5G, Reno7 Pro 5G, Reno 6 Pro 5G, Reno6 5G, Reno6 Pro Diwali Edition, F21s Pro 5G, F19s, F19, F19 Pro, A77s, F19 Pro+, F19 Pro, F19, F19s, K10 5G, k10, A96, A76, A74 आणि OPPO Pad Air हे मॉडेल्स असून आता A77 आणि A57 हे दोन मॉडेल्सही ॲड झाले आहेत.
कसा कराल नवीन अपडेट इन्स्टॉल?
- सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समधअे जावे लागेल.
- त्यानंतर About Device वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर त्यात टॉप राईटला असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करुन ट्रायल व्हर्जन ऑप्शनवर क्लिक करा. ज्यानंतर आवश्यक माहिती भरुन अप्लाय ऑप्शनवर क्लिक करा.
- ॲप्लिकेशन वेरिफायड आणि अप्रूव होताच तुम्हाला ColorOS 13 बीटी अपडेट मिळेल, ज्याला डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावा लागेल.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?