Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बॉक्स ऑफिसवर ‘द केरला स्टोरी’चं वादळ! लवकरच १०० कोटी क्लबमध्ये धडकणार; नवे सिनेमे भुईसपाट

17

मुंबई: ‘द केरला स्टोरी’ने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आणि सिद्ध केले की हा सिनेमा आता थांबणार नाहीये. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सुदिप्तो सेन दिग्दर्शित या सिनेमाने शुक्रवारी गुरुवारप्रमाणेत ११.५० कोटींचे नेट कलेक्शन केले. तर शनिवारी सकाळपासूनच चित्रपटगृहांमध्ये The Kerala Story पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीत वाढ होताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या शनिवारी १०.५० कोटींचा व्यवसाय केला होता. मात्र १३ मे रोजी (दुसरा शनिवार) मॉर्निंग शोमध्ये प्रेक्षकांच्या लांबलचक रांगा पाहता यादिवशीही सिनेमाची कमाई चांगलीच वाढण्याची शक्यता आगे. शनिवार-रविवारी चांगले कलेक्शन झाल्यास ‘द केरला स्टोरी’साठी १०० कोटी क्लब फार दूर नाही.

केरळमधील मुलींचे धर्मांतर, त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि त्यानंतर ISIS सारख्या दहशतवादी संघटनेच्या कथेवर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमा सुरुवातीपासून कथानकामुळे वादात सापडला असून पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे. तर तामिळनाडूमध्ये सिनेमागृगात प्रेक्षकच आले नसल्याचा दावा करत शो बंद करण्यात आलेत. या दोन्ही ठिकाणच्या थिएटर्समध्ये हा सिनेमा लागला नसल्याने ‘द केरला स्टोरी’ला दररोज किमान ७५ लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

आणखी एक भयंकर कथानक, आता द केरला स्टोरी फेम अभिनेत्री मराठमोळ्या अभिनेत्यासोबत करणार सिनेमा
असे असले तरी नही हा चित्रपट देशातील इतर भागांमध्ये धुमाकुळ घालतो आहे. या सिनेमाची क्रेझ पाहून गेल्यावर्षीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कॉन्ट्रोव्हर्सी, सिनेमाला होणारा विरोध, तेवढ्याच ताकदीने मिळणारा पाठिंबा या सर्व गोष्टींमुळे ‘द कश्मीर फाइल्स’शी ‘द केरला स्टोरी’ची तुलना केली जातेय. दरम्यान हा चित्रपट मुंबई, दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, हरियाणा, आंध्र/निजाम, राजस्थान आणि मध्य प्रदेश याठिकाणी सर्वाधिक कमाई करणारा ठरत आहे.

आठव्या दिवसापर्यंत ‘द केरला स्टोरी’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या रिपोर्टनुसार ‘द केरला स्टोरी’ने गुरुवारपर्यंत पहिल्या आठवड्यात ७७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर सुरुवातीच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी ११.५० कोटी रुपयांची कमाई झाली. अशाप्रकारे, ८ दिवसांत या सिनेमाचे देशाभरातील एकूण कलेक्शन ८९.०० कोटी रुपये आहे. कॉन्ट्रोव्हर्सी आणि राजकीय वर्तुळातील वाद या गोष्टीचा फायदा ‘द केरला स्टोरी’ला झाला यात शंका नाही. मीडिया रिपोर्टनसार या सिनेमाचे बुकिंग ‘द कश्मीर फाइल्स’ पेक्षा जास्त ऑर्गेनिक आहे. हा चित्रपट मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये करमुक्त आहे. त्यामुळे या भागात तिकीट दर कमी असल्याने प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत.

The Kerala Story चा वाद संपेना, तरीही निर्मात्यांची मोठी उडी; ३७ देशात होणार प्रदर्शित
आतापर्यंतचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन

The Kerala Story Box Office Collection Source: BoxOfficeIndia
शुक्रवार, पहिला दिवस ०६.७५ कोटी रुपये
शनिवार, दुसरा दिवस १०.५० कोटी रुपये
रविवार, तिसरा दिवस १६.०० कोटी रुपये
सोमवार, चौथा दिवस १०.०० कोटी रुपये
मंगळवार, पाचवा दिवस ११.०० कोटी रुपये
बुधवार, सहावा दिवस ११.७५ कोटी रुपये
गुरुवार, सातवा दिवस ११.५० कोटी रुपये
शुक्रवार, आठवा दिवस ११.५० कोटी रुपये*
पहिल्या आठवड्यात एकूण कमाई ८९.०० कोटी रुपये

‘छत्रपती’, ‘म्युझिक स्कूल’ सपशेल आपटले

या शुक्रवारी बॉलिवूडचे इतर तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. विद्युत जामवालचा ‘IB 71’, बेल्लमकोंडा श्रीनिवासचा ‘छत्रपती’ आणि शर्मन जोशीचा ‘म्युझिक स्कूल’, अशा तीन सिनेमांनी मिळूनही ‘द केरला स्टोरी’चे काहीही नुकसान केले नाही. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाच्या वादळात नव्याने प्रदर्शित झालेल्या तिन्ही चित्रपटांची अवस्था दयनीय झाली आहे. हॉलिवूडचा ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी ३’ मात्र मोठ्या शहरात चालत असून, कोट्यवधींची कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे

एकाच समाजाला पाठिंबा देणं चुकीचं, ‘केरला स्टोरी’ वर टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना फडणवीसांनी सुनावलं

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.