Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एआयने बनवले फेक ट्रॅक
नुकतीच एका स्कॅमरने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ने फेक फ्रँक ओशन ट्रॅक बनवून विकले आहे. या स्कॅमरने जवळपास ७ लाख रुपयाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे एआयने बनवलेला फेक ट्रॅक इतका ओरिजनल वाटत होता की, यूजर्सला ते ओळखणे कठीण झाले. तुमच्या माहितीसाठी, फ्रँक ओशन एक लोकप्रिय अमेरिकी गायक आणि लेखक आहे. द व्हाइसच्या माहितीनुसार, स्कॅमरने आता जवळपास बनावट संगीत विकून ७ लाख रुपयांची कमाई केली आहे.
वाचाः Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान
एआयचे धोके
म्हणून प्रश्न उपस्थित होत आहे की, एआयचा वापर सध्या कोणत्याही कायद्यात आणि गाइडलाइन मध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे एआयच्या वापरावरून सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे. एआयचा वापरावरून आर्टिस्टच्या क्रिएटिव्हवर काम करणाऱ्यांचेही नुकसान होत आहे. जर एआयचा असाच वापर होत राहिला तर आगामी काही दिवसात एआय जास्त धोकादायक ठरू शकतो. म्यूझिक मिंग प्लॅटफॉर्म स्पॉटिफायने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) म्यूजिक स्टार्टअप बुमीच्या हजारो गाण्याला हटवले आहे. याचप्रमाणे जानेवारी २०२३ मध्ये Apple Music ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून फके ट्रॅक्सची ओळख पटवणे सुरू केले आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?