Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘या’ आठवड्यात लाँच झाले हे स्मार्टफोन, पाहा फोनची संपूर्ण लिस्ट, किंमत आणि फीचर्स

14

​भारतात स्मार्टफोनचे मार्केट खूप मोठे आहे. देश तसेच विदेशातील अनेक कंपन्या आपला स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये लाँच करीत असतात. दर आठवड्याला कंपन्या फोनला लाँच करतात. गेल्या आठवड्यात सुद्धा अनेक कंपन्यांनी आपले फोन तसेच टॅबलेट लाँच केले आहेत.
या आठवड्यात अनेक कंपन्यांनी आपले स्मार्टफोन लाँच केले आहेत. या यादीत POCO, Redmi, Realme आणि गुगल सारख्या ब्रँडचा समावेश आहे. गुगलने आपली पिक्सल ७ सीरीज अंतर्गत Google Pixel 7a ला भारतात लाँच केले आहे. पोकोने मिड रेंज किलर POCO F5 ला आणले आहे. हा फोन १२ जीबी रॅम सोबत येतो. तुम्हाला जर नवीन फोन खरेदी करायचा असेल तर या आठवड्यात कोणकोणते फोन लाँच झाले आहेत. याची सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

​Google Pixel 7a

गुगलने आपला नवीन फोन Google Pixel 7a ला लाँच केले आहे. या फोनमध्ये ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन दिले आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये 4385mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंट मध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ४३ हजार ९९९ रुपये आहे.

​वाचाः Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान​

​Nokia 110 (2023), Nokia 105 (2023) आणि Nokia 106

nokia-110-2023-nokia-105-2023-nokia-106

नोकियाने एकाचवेळी तीन फीचर फोन लाँच केले आहेत. या फोनला दमदार बॅटरी लाइफ आणि वायरलेस एफएम रेडिओ सोबत आणले आहे. Nokia 106 मध्ये म्यूझिक प्लेअर आणि स्नेक गेम सुद्धा मिळतो. तर Nokia 105 मध्ये टॉर्च आणि नॉर्मल कॉल मेनूचा सपोर्ट मिळतो. Nokia 110 आणि Nokia 105 ला नवीन व्हर्जन मध्ये आणले आहे.

​वाचाः Mother’s Day 2023 साठी आईला काय गिफ्ट देऊ हा विचार करताय? ही ५ गॅजेट्स आहेत बेस्ट ऑप्शन

Poco F5 5G

poco-f5-5g

Poco F5 5G ला स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर आणि 12 जीबी रॅम सोबत आणले आहे. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा ६६७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले मिळतो. डिस्प्ले सोबत कॉर्निंग गोरिला ग्लास ५, डॉल्बी व्हिजन HDR10 + चा सपोर्ट आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम दिले आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W टर्बो चार्जिंग आहे.

​वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Google Pixel Tablet

google-pixel-tablet

Google I/O 2023 मध्ये Pixel 7a आणि Pixel Fold शिवाय, Google Pixel Tablet ला सुद्धा लाँच करण्यात आले आहे. Google Pixel Tablet कंपनीचा पहिला टॅबलेट आहे. यात Tensor G2 प्रोसेसर दिले आहे. या टॅबलेट मध्ये ११ इंचाची एलसीडी स्क्रीन दिली आहे. Google Pixel Tablet मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. टॅब मध्ये 27Wh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १२ तासाचा प्लेबॅक टाइम देते. टॅब मध्ये क्वॉड स्पीकर, तीन मायक्रोफोन, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि साइज माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Sony Xperia 1 V

sony-xperia-1-v

सोनीने नवीन फोनला फ्लॅगशीप Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा सेटअप सोबत Exmor T इमेज सेंसर सोबत आणले आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा ६.५ इंचाचा ओलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. Sony Xperia 1 V मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ५२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सोनीच्या लेटेस्ट फोनमध्ये फास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 1,399 डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख १४ हजार ७०० रुपये आहे.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं? ​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.