Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

The Kerala Story पुढे सगळ्यांनीच हात टेकले, जे शाहरुखला जमलं नाही ते अदा शर्माने केलं

16

मुंबई- केरलामधील मुलींचे धर्मांतर, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यानंतर ISIS सारखी दहशतवादी संघटना या कथेवर आधारित ‘द केरला स्टोरी’ सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाची फक्त चर्चा नाही तर प्रचंड कमाईही सुरू आहे. नवव्या दिवशी, शनिवारी ‘द केरला स्टोरी’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला. छोट्या बजेटच्या या चित्रपटावर कितीही वाद झाला तरी त्याची कमाई गगनाला भिडली. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ने १० व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला ते पाहू.Adah Sharma Health: हिंदू एकता यात्रेला जाताना अदा शर्माचा अपघात, जाणून घ्या कशी आहे तब्येत
द केरला स्टोरी बॉक्स ऑफिस कलेक्शन

रिलीज झाल्यापासून, चित्रपटाने त्याच्या 10 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे ‘द केरला स्टोरी’च्या दहाव्या दिवसाच्या कमाईने ‘पठाण’च्या कमाईलाही मागे टाकले आहे. आजपर्यंत १० व्या दिवशी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ‘द केरला स्टोरी’ ने १४ मे रोजी जबरदस्त कमाई केली. चित्रपटाने दुसऱ्या रविवारी सुमारे २३.२५ कोटींचाचा गल्ला जमवला आहे, जो संपूर्ण १० दिवसांतील सर्वात मोठा आकडा आहे.


The Kerala Story Collection:

दिवस कमाई
पहिला आठवडा ७७.६१ कोटी रुपये
शुक्रवार ११.५० कोटी
शनिवार १९.०० कोटी
रविवार २३.२५ कोटी
एकूण कमाई १३१.३६ कोटी रुपये

१० व्या दिवशी १३१ कोटींचा आकडा पार केला

The Kerala Story net collection in just 10 days: बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने शनिवारपर्यंत सुमारे १०८ कोटी रुपये कमावले होते, रविवारच्या २३.२५ कोटी रुपयांच्या कमाईमुळे हा आकडा १३१.३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चित्रपटाच्या या आकड्याने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि रणबीर कपूर-श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कर’ सारख्या अनेक चित्रपटांच्या १० वव्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. इतकंच नाही तर सॅकनिल्‍कनुसार, शाहरुख खानच्‍या ‘पठाण’ने १० व्या दिवशी देशभरातील सर्व भाषांमध्ये केवळ १४ कोटी रुपये कमावले, तर ‘द केरला स्टोरी’ने १० व्या दिवशी यापेक्षा ९ कोटी अधिक कमावले.

सिनेमाने कोणत्या राज्यात केली सर्वाधिक कमाई

पुणे, मुंबई आणि दिल्ली या भागात हा चित्रपट कमालीची कामगिरी करत आहे. सुदीप्तो सेनच्या या चित्रपटात केरलामधील अनेक मुलींची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. या मुलींचे त्यांच्या धर्माविरुद्ध कसे ब्रेनवॉश केले जाते आणि नंतर त्यांना धर्मांतर करण्यास कसे भाग पाडले जाते हे चित्रपटात दाखवले आहे. तसेच त्यांना ISIS मध्ये कशापद्धतीने पाठवले जाते हेही सिनेमात दाखवण्यात आले आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.