Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अंतराळात सूर्याच्या परिक्रमा करताना लघुग्रह लागोपाठ पृथ्वीच्या दिशेने येत असतो. येथून जवळून ते जात असतो. नासाने आज सकाळी ३ मोठे लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याचा अलर्ट जारी केला आहे. अंतराळात लघुग्रहावर नजर ठेवणाऱ्या नासाच्या जेट प्रॉपल्शन लेबोरेटरीकडून या तिन्ही लघुग्रहासंबंधी माहिती दिली आहे. JPL च्या माहितीनुसार, आज 2023 JS1 नावाचे लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हे ३९ फुट मोठे आहे. म्हणजेच कोणत्याही बस इतके हे मोठे आहे. याची स्पीड २८ हजार किमी प्रति तास हून जास्त आहे. ज्यावेळी हे पृथ्वीच्या जवळून जाईल. त्यावेळी या दोघांतील अंतर २,१७०,००० किमी असेल.
वाचाः महिन्याला फक्त ९९ रुपये खर्च करा, अन् मिळवा ३ जीबी डेटा, SMS आणि व्हाइस कॉलिंग
JPL ने आज एक अन्य लघुग्रह 2023 JT2 पृथ्वीच्या दिशेने येणार असल्याचा अलर्ट जारी केला आहे. हे ३० फुट लघुग्रह असून साधारणः बसच्या आकारा इतके मोठे आहे. हे २,६५०,००० किमीच्या अंतराने पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. तसेच एक तिसरे लघुग्रह सुद्धा आज पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. याचे नाव 2023 JC3 आहे. हे ६३ फुटाच्या आकाराचे आहे. हे तिन्ही लघुग्रह आज पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत. जर हे पृथ्वीच्या जवळून जास्त गेले तर नुकसान होऊ शकते. परंतु, हे जास्त मोठे नाही. कारण, १५० फुटापेक्षा जास्त मोठे लघुग्रह असेल तर पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो.
वाचाः नवीन रेल्वे ॲप लाँच, कन्फर्म तिकिटासोबत मिळेल Netflix ची मजा