Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि मणिपूर मधील CUET (UG) – 2023 केंद्रांबद्दल स्पष्टीकरण

25

शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक सत्र 2023-2024 साठी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय विद्यापीठे आणि इतर सहभागी विद्यापीठे / संस्था / ऑर्गनायझेन/ स्वायत्त महाविद्यालयामध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्समधील प्रवेशासाठी कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) देणे अनिवार्य केले आहे.CUET (UG) – 2023 खालील वेळापत्रकानुसार NTA द्वारे संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात सुमारे 14.99 लाख उमेदवारांसाठी देशभरातील 295 शहरांमध्ये आणि परदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जात आहे:

परीक्षा / सत्र CUET (UG) – 2023

CUET (UG) – 2023 चे 14,99,778 (चौदा लाख एकोणण्णव हजार सातशे अठ्ठ्याहत्तर) उमेदवार ज्यांनी 64,35,050 चाचणी पेपर्ससाठी निवड केली आहे. या उमेदवारांनी शैक्षणिक सत्र २०२३ – २४ करिता 250 केंद्र, राज्य आणि इतर सहभागी विद्यापीठे/संस्था/ऑर्गनायझेशन्समधील विविध विषयांच्या 48,779 युनिक समीकरणासाठी अर्ज केले आहेत.

परीक्षेकरिता सिटी इंटिमेशन स्लीप मिळण्याची तारीख 808441 करिता 21, 22, 23 आणि 24 मे, 2023 नियोजित करण्यात आली आहे आणि 771095 उमेदवारांकरिता 25,26,27 आणि 28 मे, 2023 अनुक्रमे 14 मे, 2023 आणि 16 मे, 2023 रोजी संकेतस्थळ https://cuet.samarth.ac.in/ यावर संयोजन करण्यात आले आहे. 08 दिवसांकरिता एकूण संख्या (21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 May 2023) 1579536 इतकी आहे.

सिटी इंटीमेशन स्लिपमध्ये तारीख, परीक्षेची शिफ्ट, विषय/चाचणी पेपर आणि ऑनलाइन अर्ज भरताना निवडलेले माध्यम दर्शविलेले आहे. काही उमेदवारांनी सिटी इंटीमेशन स्लिपवर प्रदर्शित केलेल्या व्यतिरिक्त विषय निवडले असतील तर हे विषय नंतर जारी करण्यात येतील.

ज्या उमेदवारांच्या परीक्षा इतर तारखांना होणार आहेत त्यांच्यासाठी सिटी इंटीमेशन स्लिपदेखील लवकरच प्रसिद्ध होईल.

ज्या उमेदवारांच्या परीक्षा 21, 22, 23 आणि 24 मे रोजी होणार आहेत त्यांची प्रवेशपत्रे 19 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. NTA वरील नमूद तारखेरोजी प्रत्येक दिवशी तीन स्लॉट्सप्रमाणे परीक्षा घेतील.

जम्मू आणि काश्मीरबाबत, जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातून एकूण 87309 (ऐंशी हजार तीनशे नऊ) युनिक उमेदवारांची नोंदणी करण्यात आली आहे.

21, 22, 23 आणि 24 मे 2023 साठी एकूण 18012 उमेदवार 12 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. जे असे असतील जम्मूमध्ये 03, श्रीनगरमध्ये 05, बारामुल्लामध्ये 02, सांबा आणि पुलवामामध्ये प्रत्येकी 01

25, 26, 27 आणि 28 मे 2023 या दिवसासाठी एकूण 44425 उमेदवार जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रे निर्माण केली असून 15 केंद्रांमध्ये बसणार आहेत. काही उमेदवारांना राज्याबाहेर हलवण्यात आले आहे. तथापि, उमेदवारांच्या संवेदनशील गरजा आणि जम्मूच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि काश्मीर, एनटीए श्रीनगरमध्ये तात्पुरते केंद्र निर्माण करण्याची शक्यता शोधत आहे. NTA ला बहुतेक उमेदवारांना राज्यात परत आणण्यास सक्षम करेल. तथापि, उमेदवारांची संख्या अधिक प्रमाणात आहे आणि त्यामुळे काही उमेदवारांना CUET (UG) राज्याबाहेरून द्यावी लागू शकते.

झारखंडबद्दल, झारखंड राज्यातून एकूण 178630 (एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे) युनिक उमेदवारांची नोंदणी करण्यात आली आहे.

21, 22, 23 आणि 24 मे 2023 या दिवसांसाठी एकूण 52793 उमेदवार 19 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, जी संख्येतील अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे.

25, 26, 27 आणि 28 मे 2023 या दिवसांसाठी झारखंडमधील 14 केंद्रांवर एकूण 77797 उमेदवार परीक्षा देणार आहेत

उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या शहरात जाण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्यापैकी काही उमेदवारांना बाजूचे शहर देण्यात आले आहे. तथापि, प्रवास व्यवस्थापनाकरिता त्यांना अधिक वेळ देण्यासाठी आधीच आम्ही सिटी इंटिमेशन स्लिप देण्याचे घोषित केले आहे.
जोपर्यंत मणिपूरचा संबंध आहे, तेथे सुमारे 3697 उमेदवार आहेत ज्यांनी यापूर्वी CUET (UG) – 2023 च्या परीक्षेसाठी मणिपूरमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय निवडला होता. NTA ने राज्य प्रशासनाशी सल्लामसलत करून कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेतला आहे आणि या परीक्षेसाठी त्यांच्या पसंतीचे शहर विचारण्यासाठी या उमेदवारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. काही उमेदवार जे मणिपूरमध्ये नव्हते किंवा दुसर्‍या राज्य/शहरात परीक्षा देऊ इच्छित होते त्यांना इतर शहरांमध्ये म्हणजे दिल्ली, गुवाहाटी इ. ठिकाणाचा पर्याय विचारला जात आहे. मणिपूरमधील उमेदवारांसाठी केंद्र बदलण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे.

शिवाय, राज्य प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर, NTA ला मणिपूर राज्यात 29 मे 2023 पासून सर्व परीक्षा ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या उमेदवारांना 21 ते 24 मे 2023 साठी प्रवेशपत्र किंवा CUET (UG) – 2023 साठी 25 ते 28 मे 2023 दरम्यान होणारी सिटी इंटिमेशन स्लिप मिळाली असेल अथवा त्यांना त्यांचे परीक्षा शहर दिल्ली, गुवाहाटी इ. इम्फाळमध्ये बदलायचे असेल तर त्यांनी 011 – 40759000 / 011 – 07023 या क्रमांकावर NTA शी संपर्क साधावा आणि cuet-ug@nta.ac.in वर ई-मेल करा

CUET (UG) – 2023 साठी परीक्षेची सिटी इंटीमेशन स्लिप / प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात/तपासण्यात कोणत्याही उमेदवाराला अडचण आल्यास, तो/ती 011 – 40759000 / 011 – 69227700 वर संपर्क साधू शकतो किंवा cuet-ug@nta.ac.in वर ई-मेल करू शकतो.

उमेदवारांना परीक्षेच्या ताज्या अपडेट्ससाठी नियमितपणे NTA वेबसाइट(s) www.nta.ac.in आणि https://cuet.samarth.ac.in/ ला भेट देण्याचा सल्ला दिला जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.