Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung Galaxy F54 5G फोन लाँच होण्यापूर्वी स्पेसिफिकेशन झाले लीक, किंमत देखील समोर

12

नवी दिल्ली :Samsung Galaxy F54 5G Price and Specifications : आघाडीची स्मार्टफोन ब्रँड कंपनी सॅमसंग लवकरच आपला नवीन F-Series मधील स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. Samsung Galaxy F54 5G असं या मॉडेलचं नाव असून याची एंट्री लवकरच भारतात होऊ शकते. पण लॉन्च होण्यापूर्वी सॅमसंगच्या आगामी फोनचे डिटेल्स आणि काही खास स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम, २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आणि १०८ मेगापिक्सल ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप यांसारख्या फीचर्सचा समावेश असू शकतो. याशिवाय, असंही समोर आलं आहे की, या फोनमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी देण्यात येणार आहे.


या फोनसंबधीची माहिती ही ट्विटरवर लीक झालेली माहिती असल्याने ही अधिकृत नाही. दरम्यान या फोनच्या किंमतीचा विचार केला तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपयांपर्यंत असू शकते. दरम्यान ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची माहिती आणि किंमत अद्याप मिळालेली नाही.

Samsung Galaxy F54 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F54 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. सॅमसंगच्या या हँडसेटमध्ये Exynos 1380 प्रोसेसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy F54 5G ला 25W जलद चार्जिंगसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. Galaxy F54 5G मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह १०८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. तसंच ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि दोन २ मेगापिक्सल सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन Android 13 आधारित OneUI 5 सह येतो.

वाचा : Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.