Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung च्या दमदार स्मार्टफोनवर तगडं डिस्काउंट, १ लाख रुपयांचा फोन मिळवा २२ हजारांना, पाहा भन्नाट ऑफर

9

नवी दिल्ली :Samsung Galaxy S22 Plus : आघाडीची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगचा Samsung Galaxy S22 Plus मोठ्या डिस्काउंटखाली मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी डिस्काउंट ऑफर दिली जात आहे, ज्यामुळे आता जवळपास १ लाख रुपयांचा हा स्मार्टफोन केवळ २२ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा सॅमसंगचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर ही खास ऑफर फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमधून ग्राहकांना मिळवता येणार आहे. ही विक्री आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जर तुम्हाला Galaxy S22 Plus स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आजच फोन बुक करावा लागेल. फोनचे इतर फीचर म्हणाल तर ८जीबी रॅमसह १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो.

किंमत आणि ऑफर
Samsung Galaxy S22 Plus स्मार्टफोनची मूळ किंमत १,०१,९९९ रुपये आहे. जो Flipkart वर ४६ टक्के डिस्काउंट ऑफरसह ५४,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय या फोनच्या खरेदीवर थेट ३० हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ज्यानंतर फोनची किंमत केवळ २४,९९९ रुपये इतकी होणार आहे. याशिवाय, तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास तुम्हाला अधिकचं १० टक्के म्हणजेच २४९९ रुपयांची सूट मिळेल. यानंतर फोनची किंमत २२,५०० रुपये होईल. Samsung Galaxy S22 Plus स्मार्टफोन तुम्ही ९,१६७ रुपयांच्या मासिक EMI पर्यायावर देखील खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या खरेदीवर एक वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली जात आहे.

इतर स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S22 Plus स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तसंच १२ मेगापिक्सल आणि १० मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तसचं समोर १० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4500 mAh ची तगडी बॅटरी देण्यात आली आहे.

वाचा : Samsung Galaxy F54 5G फोन लाँच होण्यापूर्वी स्पेसिफिकेशन झाले लीक, किंमत देखील समोर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.