Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Psi Commits Suicide: पीएसआय अनिल मुळे यांची आत्महत्या; खुल्या प्लॉटमध्ये घेतला गळफास

29

हायलाइट्स:

  • पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांची झाडाला गळफास लावून आत्महत्या.
  • शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेगाव रहाटगाव रोडवरील खुल्या प्लॉटमध्ये ही घटना घडली.
  • गेल्या सहा महिन्यांपासून अनिल मुळे हे वैद्यकीय कारणामुळे रजेवर होते.

अमरावती: फ्रेजरपुरा येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेगाव रहाटगाव रोड वरील महालक्ष्मी अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या खुल्या प्लॉटमध्ये घडली. गेल्या सहा महिन्यांपासून अनिल मुळे हे वैद्यकीय कारणामुळे रजेवर होते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून नांदगाव पेठ पोलिस याबाबत तपास करीत आहेत. (police sub inspector in amravati commits suicide)

शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी लगेच नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांचेसह पीएसआय देशमुख, पीएसआय तेलगोटे, कॉन्स्टेबल खारोडे,रुपनारायण लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट नव्हती त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.

क्लिक करा आणि वाचा- हितशत्रूंकडून राजकीय जीवन संपविण्याचे प्रयत्न; आमदार संजय राठोड यांनी फेटाळले आरोप

पीएसआय अनिल मुळे हे राजापेठ पोलीस स्टेशनला कार्यरत होते. सुरुवातीला दोन महिने वैद्यकीय रजेवर होते त्यानंतर सतत चार महिन्यांपासून ते गैरहजर आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची छाप असून सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेने पोलिस वर्तुळात शोककळा पसरली आहे.

क्लिक करा आणि वाचा- आमदार सुनील शेळकेंची अडचण वाढणार?; किरीट सोमय्यांनी केली ‘ही’ मागणी
क्लिक करा आणि वाचा- पंकजा मुंडेंची नाराजी झाली दूर?; कराड यांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला पंकजाच दाखवणार हिरवा झेंडा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.