Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

2024 च्या उत्तरार्धापासून भारतातील लाखोंच्या संख्येने बहुजन बौद्ध धम्म स्वीकारताना दिसतील! विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे

17

धर्माबाद,दि.२० :- प्रतिनिधी. – एकीकडे संघाच्या माध्यमातून भाजपा हा भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी बौद्ध धम्म हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी त्याच्या सुख शांतीसाठी अस्तित्वात आलेला आहे. कुठल्याही जाती धर्मातील लोकं बौद्ध धर्म आणि धम्म पाहत नाही फक्त त्यांचे कल्याण चिंततो. व ते कशात आहे हे सांगतो. त्यामुळे जातीपातीच्या समीकरणाला कंटाळून भारतातील बहुजन वर्ग हा 2024 च्या उत्तरार्धापासून लाखोंच्या संख्येने बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करील असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे यांनी धर्माबाद मध्ये श्रामनेर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पन्नास प्रशिक्षणार्थी बालक व वयोवृद्ध श्रामणेरांचा या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग झाला आहे.
उपरोक्त श्रामणेर शिबिराचे काल शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मेणबत्ती पेटवून करण्यात आले. तद्नंतर संबोधी सोनकांबळे यांनी शिबिरास मार्गदर्शन करताना आपले मनोगतात उपरोक्त प्रतिपादन केले.
या शिबिरास प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस रविकिरण जोंधळे, जिल्हा कोषाध्यक्ष सा.ना. भालेराव, जिल्हा संघटक सचिव सुभाष नरवाडे, केंद्रीय शिक्षक आप्पाराव येरेकर, प्रशांत शहाणे, मुंबईच्या केंद्रीय शिक्षिका ज्योतीताई कुंटे, बौद्ध महासभेचे धर्माबाद तालुका अध्यक्ष सदानंद देवके, कोषाध्यक्ष सुभाष कांबळे, उपाध्यक्ष गंगाधर धडेकर, सरचिटणीस नारायण सोनटक्के यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ सल्लागार जे. के‌ जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसाळे, माजी सभापती सुधाकर जाधव, बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे, निवृत्ती पहिलवान, नामदेवराव सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदरील शिबिरास उपस्थिती लावली.
बौद्ध धम्म आणि धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जवळपास 24 शिबिरांचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने श्रामनेर शिबिर हे एक असून भारतीय बौद्ध महासभा धर्माबाद तालुका शाखेच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन अपंग महाविद्यालय, धर्माबादच्या प्रशस्त प्रांगणात करण्यात आले. सदरील शिबिरात भविष्यात बौद्ध धम्म आणि धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शिबिरात सहभागी श्रामनेरांना प्रशिक्षित केले जाते. यावेळी धर्माबाद शहरात 50च्या वर कमी वयातील तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवत मागच्या शिबिराचा विक्रम मोडीत काढला.
उपरोक्त शिबिरात सर्व दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे ठरलेली असते. श्रामणेरांना प्रशिक्षित करून भंतेमध्ये बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाचा तज्ञ प्रशिक्षक काम करीत असतात.
सकाळच्या सत्रात नाश्त्याची दुपारच्या सत्रात व सायंकाळच्या सत्रात भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठित नागरिकाकडून स्वच्छेने केली जाते. ज्यांच्या घरी नाष्टा व जेवणाची सोय आहे तिकडे जाताना सर्व श्रामणेर अतिशय शिस्तीमध्ये “तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल ह्वोवेरे हे बुद्ध ज्ञान म्हणत गल्लीतून फिरत ठराविक ठिकाणी जातात तेव्हा मोठे नयनरम्य चित्र दिसत आहे.
आज डॉक्टर सुरेश देवे यांच्या निवासस्थानी डॉ. राहुल कदम व शितल कदम या दाम्पत्यातर्फे श्रामणेरांची जेवणाची सोय करण्यात आली होती.
हे शिबिर तब्बल दहा दिवस चालणार असून या शिबिरास ज्येष्ठ पत्रकार जीपी मिसाळे यांनी शंभर वही व 100 पेन थेट म्हणून दिल्या असून त्या सहभागी श्रामनेरांना प्रशिक्षित करताना कामी पडणार आहेत.

सिध्देश्वर मठपती-धर्माबाद प्रतिनिधी

Leave A Reply

Your email address will not be published.