Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- रत्नागिरीत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई.
- शहरातील अवैध कॉल सेंटरचा झाला पर्दाफाश.
- मास्टर माइंडसह दोन जणांना ठोकल्या बेड्या.
वाचा:रत्नागिरीतील दापोली शहरात गांजा विक्रीचे जाळे; नेमका सूत्रधार कोण?
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे शंकेश्वर आर्केड येथील श्रीटेक मोबाइल अॅण्ड टेककॉम शॉप या मोबाइल व अन्य तत्सम साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तेथे संगणकाचा व इंटरनेट सेवेचा वापर करून अवैध दूरसंचार सेवा पुरविली जात असल्याचे आढळून आले. त्यासाठी लागणारी यंत्रणा दुकानात आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी दुकानाचा मालक अलंकार अरविंद विचारे (वय ३८ वर्षे, रा. शाळीग्राम, छत्रपतीनगर, रत्नागिरी) व इतर एका आरोपी विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे माहिती व तंत्रज्ञान अधिनिमय, २००० आणि भारतीय टेलीग्राफ कायदा, १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद सहायक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर यांनी दिली आहे.
वाचा:BHR Scam: सुनील झंवरबाबत गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
दहशतवाद विरोधी पथक आणि रत्नागिरी पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अलंकार अरविंद विचारे याच्यासह फैजल रजा अली रजा सिद्दीकि (रा. एलसी / ४११ कॉस्मो पॉलिटन, सरकारी रेस्ट हाऊस मागे ता. पनवेल, नवी मुंबई ) याला बेड्या ठोकण्यात आल्या. फैजल हा यातील मास्टर माइंड असल्याचे उघड झाले आहे. या दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल लाड हे करत आहेत.
वाचा:…तर तो ठाकरे कसला! नवीन जबाबदारीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
दरम्यान, हायस्पीड इंटरनेटद्वारे एसआयपी ट्रंकिंगचा उपयोग करून कमी पैशात देशासह परदेशातही कॉल केले जातात. एसआयपी ट्रंकिंगचा मोठ्या प्रमाणात वापर दहशतवादी कृत्ये करण्यासाठी झाल्याचे आढळून आलेले आहे. रत्नागिरीत अशाप्रकारचे अवैध कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती. ही माहिती रत्नागिरी येथील दहशतवाद विरोधी पथकाला देण्यात आली. त्यानंतर तत्काळ तपासाची सूत्रे फिरली व कारवाई करण्यात आली. या कॉल सेंटर प्रकरणी तपासात महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे.
वाचा: आमदार नियुक्तीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्यपाल कोश्यारींना धक्का