Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
24 तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे शहर पोलीस आयुक्त,व सह पोलीस आयुक्त. यांचा अभिनव उपक्रम
पुणे,दि.२२:- पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार,व सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेतुन 24 तास कर्तव्यावर असणार्या पुणे शहर पोलिसांच्या पाल्यांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पाल्यांसाठी 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत एकुण 75 पोलिस दलातील कर्मचार्यांची मुले सहभागी झाली होती. 3 दिवसीय कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरूवात होप फॉर चिल्ड्रन फाऊंडेशनने प्रात्यक्षिकांमधून मुलांचा सर्वांगीण विकास या आगळया-वेगळया कार्यक्रमाने झाली. ज्यामध्ये मुलांना वेगवेगळी कौशल्य विकसित करण्याचे तंत्र शिकवण्यात आले. कार्यशाळेच्या दुसर्या दिवशी शिक्षणतज्ञ व समुपदेशक अनिल गुंजाळ यांचे
व्याख्यान झाले. त्यामध्ये आनंदाने कसे शिकुया आणि करिअरचे विविध पर्याय याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
ज्ञान प्रबोधिनी प्रशालातर्फे आठवी ते दहावीच्या मुलांची अॅपटीटयूट टेस्ट घेण्यात आली.
ही टेस्ट ज्ञान प्रबोधिनी प्रशाला यांनी पुणे पोलिसांच्या पाल्यांसाठी विशेष सवलत देऊन उपलब्ध करून दिलीतिसर्या दिवशी चाईल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. भूषण शुक्ला यांचे व्याख्यान झाले.
त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये मुलांनी स्वतःच्या भावना कशा
हाताळायच्या आणि यशस्वी कसे व्हायचे याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट हा आर्ट ऑफ लिविंग यांच्या मेडिटेशन सत्राने करण्यात आला.
झालेल्या 3 दिवसीय कार्यशाळेत 75 मुलांनी सहभाग नोंदविला आहे.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचार्यांसह होम फॉर चिल्ड्रन फाऊंडेशन,
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, आर्ट ऑफ लिविंग आणि इतर मान्यवर वक्त्यांनी मोलार्च सहकार्य केले.
पिनॅकल इंडस्ट्रीज शिवाजीनगर, पुणे यांनी देखील सहकार्य केले.