Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WhatsApp Scam पासून कसं राहाल सावध? फक्त ‘या’ ५ गोष्टी करा फॉलो

17

नवी दिल्ली : How to Prevent WhatsApp Scam :भारतासह संपूर्ण जगात व्हॉट्सॲप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप आहे.पण याच व्हॉट्सॲपवर सध्या स्कॅमर्सचा सुळसूळाट झाला आहे. स्कॅमर्स व्हॉट्सॲपद्वारे वापरकर्त्यांशी संपर्क साधतात. आजकाल स्कॅमर आंतरराष्ट्रीय नंबर वापरतात आणि कमिशन मिळवण्याचं आमिष देऊन किंवा घरबसल्या जॉब ऑफर करतात. अशा जॉब ऑफर पाहून, वापरकर्ते आकर्षित होतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन स्कॅमला बळी पडतात. तर या स्कॅमपासून वाचण्याकरता काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, तसंच या स्कॅमबद्दलही समजून घ्यावं लागेल.

हे स्कॅमर कोणत्या प्रकारचे WhatsApp मेसेज पाठवतात?

घोटाळेबाज व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे जास्त उत्पन्न आणि कमी मेहनतीचे आमिष दाखवतात. स्कॅमर्स म्हणतात की अर्धावेळ नोकरीकरुन भरपूर पैसे तुम्ही कमवू शकता. यासाठी दररोज १० ते ३० मिनिटं काम करावं लागेल. स्कॅमर एका प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगतात आणि नंतर पुढील क्लिकवर क्लिक करायला सांगतात, या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात.

WhatsApp स्कॅमपासून सुरक्षित कसे राहायचे?

  • जर तुम्हाला असा काही मेसेज आला की जो तुम्हाला खोटा वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. अनोळखी किंवा सेव्ह न केलेल्या नंबरवरून आलेल्या मेसेजसना ते वेरिफायड मेसेज असल्याची खात्री असल्याशिवाय त्यांना उत्तर देऊ नका.
  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तुम्हाला आमिष दाखवण्यासाठी अशा लिंक पाठवल्या जातात. तुमच्या डिव्हाइसवर क्लिक करून मालवेअर अर्थात व्हायरस देखील येऊ शकतात. या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही थेट टेलिग्रामवर पोहोचता आणि फसवणुकीत अडकता.
  • ज्या व्यक्तीने तुम्हाला संदेश पाठवला आहे त्याची ओळख वेरिफाय करा. कोणीतरी तुम्हाला फसवणूक संदेश पाठवत आहे की नाही हे तुम्ही ऑनलाइन देखील तपासू शकता.
  • कोणत्याही मेसेजवर आपली वैयक्तिक माहिती टाकू करा. तसेच, तुमचे पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड तपशील कोणालाही देऊ नका. यामुळे तुमच्यासोबत आर्थिक फसवणूक होऊ शकते.
  • तुमचे डिव्हाइस नेहमी अपडेटेड ठेवा. फोनमध्ये अँटीव्हायरस किंवा सिक्युरिटी सॉफ्टवेअर असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे फोन स्कॅम आणि मालवेअरपासून सुरक्षित राहतो.

How to Whatsapp Without Saving Number : Whatsapp पर बिना नंबर सेव किए ऐसे करें Message

वाचा : WhatsApp वर चुकून चुकिचा मेसेज सेंड झाला, टेन्शन नको आता मेसेज सेंट झाल्यावरही करता येणार बदल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.