Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दमदार बॅटरीचे ३ नवे स्मार्टफोन बाजारात, Infinix Note 30 सिरीजची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

22

नवी दिल्ली : Infinix Note 30 सिरीज अखेर जागतिक बाजारात लॉन्च झाली आहे. Infinix Note 30 मालिकेत कंपनीने Infinix Note 30, Note 30 5G आणि Note 30 Pro 5G असे एकूण तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Infinix ने या तिन्ही प्रोडक्टच्या फीचर्सबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान तिन्ही प्रोडक्ट्सच किंमत अद्याप समोर आलेली नाही. तर Infinix Note 30 4G, Note 30 5G आणि Note 30 Pro असं या सिरीजमधील मॉडेल्सचं नाव आहे. चला तर या तिन्ही Infinix स्मार्टफोनबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

Infinix Note 30 फीचर्स

Infinix Note 30 4G स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा मोठा IPS LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या मध्यभागी एक पंच-होल आहे. स्क्रीन फुलएचडी+ रेझोल्यूशनसह येते. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 240 Hz आहे. हँडसेटमध्ये ६४ मेगापिक्सल OmniVision OV64B प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सेल सेंकडरी आणि AI लेन्ससह ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

तसंच Infinix Note 30 4G स्मार्टफोनला ८ GB रॅम देण्यात आला आहे. फोन MediaTek Helio G99 प्रोसेसरसह हा येतो. हँडसेट १२८ GB आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे. फोनला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे .जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन रिव्हर्स वायर्ड चार्जिंगसह येतो. हँडसेट JBL-चालित ड्युअल स्टीरिओ स्पीकर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, NFC, 3.5mm ऑडिओ जॅक आणि Android 13 सारखे फीचर्स आहेत. हे मॉडेल मॅजिक ब्लॅक, सनसेट गोल्ड आणि इंटरस्टेलर ब्लू या कलर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आता यानंतर Infinix Note 30 5G चा विचार केला तर 4G सारखाच डिस्प्ले Infinix Note 30 5G स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये १०८ मेगापिक्सल Samsung ISOCELL HM6, २ मेगापिक्आणि AI लेन्ससह ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. MediaTek Dimensity 6080 चिपसेट हँडसेटमध्ये उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ७ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Infinix Note 30 5G मध्ये 4 GB आणि 8 GB रॅम पर्यायांसह 128 GB आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज हा देखील पर्याय आहे. डिव्हाइसमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी 45W चार्जिंगला सपोर्ट करत.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.