Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या काश्मिराने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. पुण्याचा चाणक्य मंडळाची विद्यार्थीनी असलेल्या काश्मिराने देशात २५ वी तर राज्यात पहिला येण्याचा मान मिळवलेला आहे.
कश्मिराला या यशाबद्दल विचारले असता ती सांगते, सध्या तरी यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तरीही माझे कुटुंब आणि मित्रपरिवाराचे मला सहकार्य लाभल्याने हे यश शक्य झाले आहे.
कश्मिराची मोठी बहिण डेंटिस्ट आहे. यूपीएससी परीक्षा देण्याआधी कश्मिरा तिच्या ताईच्या क्लिनिक मध्ये सहायक डेंटिस्ट म्हणून काम करीत होती. यूपीएससीचा अभ्यास करताना ताईने मला संभाळून घेतले. बऱ्याचदा रुग्ण देखील खूप असायचे. त्यावेळी अभ्यास आणि क्लिनिक संभाळावे लागायचे असे ती सांगते.
कश्मिराने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई बाबांना दिले. लहानपणापासून त्यांनी यूपीएससीसाठी प्रेरणा दिली. सकाळची सुरुवात बाबांच्या, ‘उठा, आयएएस ऑफिसर’, या वाक्याने व्हायची असेही तिने सांगितले.
यासोबतच आपण जिवनविद्येच्या बालसंस्कार केंद्रात जायचो. सद्गगुरु वामनराव पै यांची शिकवण कामी आल्याचे ती सांगते.
सरकारी अधिकारी बनून भविष्यात मला गरजूंना मदत करायची असल्याचे कश्मिरा सांगते.
UPSC CSE Result: असा पाहा निकाल
निकाल पाहण्यासाठी, सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in आणि upsconline.nic.in ला भेट द्या. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध असलेल्या “UPSC सिव्हिल सर्व्हिसेस रिझल्ट २०२२” वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर UPSC निकाल २०२२ ची PDF दिसेल.
यात निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची यादी पाहता येईल.
रोल नंबर शोधण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट “Ctrl+F” वापरा. जर उमेदवाराचा रोल नंबर यादीत असेल तर तो/ती पात्र असणे आवश्यक आहे. यानंतर निकालाची प्रिंट आउट डाउनलोड करता येईल.