Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१००-२०० कोटी नव्हे, बाहुबली २ चित्रपटानं चीनमध्ये कमावले होते तब्बल…. आकडा वाचून येईल चक्कर

13

मुंबई टाइम्स टीमबॉलिवूडचे चित्रपट जगभरात प्रदर्शित होतात. अलीकडे तर ही संख्या वाढली आहे. असं असलं तरी परदेशात प्रदर्शित होणारे सिनेमे तुलनेनं कमी कमाई करतात. हे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं. आता मात्र परिस्थिती बदललेली दिसते. हल्ली काही चित्रपट भारतापेक्षा परदेशातच जास्त चालत असल्याचं दिसून येतंय. अमेरिका, युरोपप्रमाणेच चीनमध्येही बॉलिवूड चित्रपट चांगली कमाई करत असल्याचा निर्मात्यांना अनुभव येतोय. त्यामुळे आगामी काळात तिथेही अधिकाधिक हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याची चिन्हं आहेत.

साधारण सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘दंगल’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आपल्या देशात या सिनेमानं ३८७ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला. तर त्याच्याच पुढच्या वर्षी आलेल्या ‘बाहुबली २’ या हिंदीमध्ये डब केलेल्या चित्रपटानं ५१० कोटींची कमाई करत ‘दंगल’ला मागे टाकलं. हिंदीमधील ‘बाहुबली २’ या सिनेमानं जगभरात एकूण १८०० कोटींचा गल्ला कमावला. तर एकट्या ‘दंगल’ने फक्त चीनमध्ये १३०० कोटींचा गल्ला केला. या चित्रपटानं जगभरात एकूण २००० कोटी कमाई करत ‘बाहुबली २’ला मागे टाकलं. भारताबाहेर ‘बाहुबली २’पेक्षा ‘दंगल’ अधिक यशस्वी ठरला. यातील मुख्य वाटा ठरला तो चीनमधली १३०० कोटींच्या कमाईचा. त्यानंतर आलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटानं भारतात ६३ कोटी कमाई केली; तर याच चित्रपटानं चीनमधे ७५० कोटी कमावले. या सिनेमात आमिर खानची छोटी भूमिका होती. चीनमध्ये आमिरचा चाहतावर्ग मोठा आहे हे ‘३ इडियट्स’, ‘पीके’ या चित्रपटांना मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आलं आहे. आमिरच्या सिनेमांसह इतर हिंदी सिनेमेही तेथील प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. आजवर तिथे सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या चित्रपटांमध्ये ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘पीके’, ‘अंधाधुन’, ‘बजरंगी भाईजान’, ‘हिंदी मीडिअम’, ‘हिचकी’, ‘मॉम’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘बाहुबली २’ या चित्रपटांचा समावेश आहे.
म्हणून तो बादशाह! चाहती मरणाच्या दारात, शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी शाहरुखची धडपड
करोनाकाळात चीनमधील बॉलिवूड सिनेमांच्या प्रदर्शनाला थोडा ब्रेक लागला असला तरी त्यानंतर पुन्हा एकदा आता हिंदी आणि दाक्षिणात्य अशा दोन्हीकडील निर्माते चीनमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास उत्सुक आहेत. वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या जोडीचा ‘सुई धागा’ आणि श्रीदेवी अभिनित ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटांना प्रेक्षकपसंती मिळाली होती.

आदित्यचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे नाही तर… जवळच्या मैत्रिणीचा वेगळाच दावा

प्रदर्शनाची परवानगी अवघड; प्रतिसाद मात्र उत्तम
जाणकारांच्या मते, चीनमध्ये वर्षभरात केवळ ३०-३५ विदेशी चित्रपटांनाच परवानगी मिळते. त्यातही हिंदी चित्रपटांना हॉलिवूड आणि अन्य देशांतील चित्रपटांशी स्पर्धा करावी लागते. तिथे स्क्रीन्स खूप आहेत. त्यामुळे सगळेच तिथे चित्रपट प्रदर्शित करण्यास उत्सुक असतात. करोनानंतर भारतात सिनेमागृहांमधील स्क्रीन्सची संख्या १२ हजारवरून ८ हजारावर आली. तिकडे मात्र त्यांची संख्या आजही जवळपास ८० हजार अर्थात दहापट जास्त आहे. तिथे चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. चीनमध्ये चित्रपट यशस्वी होण्यासाठी चित्रपटाचा विषयसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो, असं तज्ज्ञांना वाटतं. आतापर्यंत तिथे चांगला प्रतिसाद मिळालेल्या चित्रपटांवर नजर टाकली तर असं दिसून येतं की, मानवी भावनांना, कथांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या चित्रपटांना जास्त प्रतिसाद मिळतो.

संकलन : स्वाती भट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.