Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी.
- शेतकऱ्यांची केलेली चेष्टा आम्ही खपवून घेणार नाही!
- राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा.
वाचा: आमदार नियुक्तीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्यपाल कोश्यारींना धक्का
कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर व सांगली दौऱ्यात शेतकऱ्यांना मोठी मदत करण्याची ग्वाही दिली होती पण प्रत्यक्षात एकराला तीन ते चार हजार रुपयेच मिळणार आहेत. कुजलेला ऊस काढायला दहा हजार रुपये आणि मदत मिळणार पाच हजार रुपये. यामुळे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. ही चेष्टा आम्ही खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय राहिला नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
वाचा:‘मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे काढण्यापेक्षा…’, अशोक चव्हाण यांची भाजपवर खोचक टीका
राजू शेट्टी म्हणाले की, २०१९च्या महापुराच्या धर्तीवर पिकावर काढलेले सर्व कर्ज माफ करावे, कृष्णा आणि उपनद्यांवर असलेल्या १०३ पुलांवरील भराव काढून तेथे कमानीचे पूल बांधावेत, पूरग्रस्त भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे यासह विविध मागण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. कृष्णा आणि त्याच्या उपनद्यांवर एकशे तीन ठिकाणी पूल आहेत. नद्यांची पाणी धारण क्षमता कमी झाली आहे. यामुळे पिकांचे महापुरात मोठे नुकसान होते. दरवर्षी ११ ते १२ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यापेक्षा सरकारने एकदाच कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास गट नेमून अहवाल घ्यावा आणि कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणीही शेट्टी यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील उपस्थित होते.
वाचा:…म्हणून कॉकटेल लस देणं चुकीचं; पूनावाला यांनी करून दिली धोक्याची जाणीव