Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तगडा प्रोसेसर, UHD+ 4K डिस्प्लेसह दमदार फीचर्स असणारे Dell कंपनीचे ३ लॅपटॉप भारतात लाँच

9

नवी दिल्ली :Dell XPS Series Launched in India : लॅपटॉपच्या विश्वात आघाडीची कंपनी डेलने आपली नवी Dell XPS Series भारतात आणली आहे. कंपनीने Dell XPS 13 Plus, XPS 15 आणि XPS 17 हे तीन मॉडेल्स भारतात लाँच केले आहेत. डेलच्या या तीन नोटबुकमध्ये लेटेस्ट असा 13th Gen Intel Core प्रोसेसर देण्यात आला आहे. मागील पिढीच्या लॅपटॉपप्रमाणे, या लेटेस्ट डेल लॅपटॉप मॉडेल्समध्ये आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम बिल्ड गुणवत्ता आहे. चला तर या तिन्ही Dell XPS 13 Plus, XPS 15 आणि XPS 17 लॅपटॉपच्या किंमती आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊ…

XPS नोटबुकच्या 2023 मालिकेत क्वाड स्पीकर सेटअप देण्यात आला आहे. नवीन लॅपटॉप ४ साइड इन्फिनिटीएज टच डिस्प्ले आणि मेटल बिल्ड सारख्या फीचर्ससह हे लॅपटॉप येतात. हे लॅपटॉप ड्युअल सेन्सर कॅमेऱ्यांसह येतात आणि विंडोज हॅलो फेस रेकग्निशन सपोर्ट देतात.

Dell XPS १५ चे फीचर्स
नवीन Dell XPS 15 लॅपटॉपमध्ये 3.5K OLED टच स्क्रीन आहे जी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ६ प्रोटेक्शनसह येते. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर या कन्वर्टिबल लॅपटॉपमध्ये NVIDIA GeForce RTX 4050 GPU देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये ३२ जीबी पर्यंत रॅम उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये १ टीबी पर्यंत स्टोरेजचा पर्याय ही देण्यात आला आहे.

Dell XPS 13 Plus चे फीचर्स

Dell XPS 13 Plus बद्दल बोलायचं झालं तर, यात १३ इंच स्क्रीन असलेला हा लॅपटॉप XPS सीरीजचा सर्वात पॉवरफुल डिवाइस असल्याचं कंपनीचं मत आहे. या मशीनमध्ये UHD+ 4K रिझोल्यूशन डिस्प्ले उपलब्ध आहे आणि त्यात ग्लास टचपॅड आहे. हा लॅपटॉप 13th gen intel core प्रोसेसरसह येतो. या लॅपटॉपमध्ये Intel Iris Xe ग्राफिक्स उपलब्ध आहे. लॅपटॉपचे वजन १ किलोपेक्षा जास्त आहे.

Dell XPS 17 चे फीचर्स

Dell XPS 17 बद्दल समोर येणाऱ्या माहितीनुसार हा XPS मालिकेतील सर्वात शक्तिशाली लॅपटॉप आहे. या वेरिएंटमध्ये १७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये NVIDIA GeForce RTX 4070 GPU देण्यात आला आहे. हे ग्राफिक्स कार्ड सहसा हाय-एंड गेमिंग मशीनमध्ये पाहिले जाते. या लॅपटॉपमध्ये ३२ जीबी पर्यंत रॅम उपलब्ध आहे.

किंमतीचं काय?

Dell XPS 15 9530 लॅपटॉपची किंमत २,४९,९९० रुपये आहे. तर XPS 13 Plus 9320 लॅपटॉपची किंमत १,९९,९९० रुपये आहे. तर XPS 17 9730 व्हेरिएंट २,९९,९९० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व तीन लॅपटॉप मॉडेल्स २३ मे पासून डेलच्या वेबसाइट, ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात.

वाचाः Window AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.