Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात मॅचवर बेटिंग घेणारे 6 बुक्कीं पुणे शहर ग

10

पुणे,दि.२५ :- खराडी परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकून आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍यांचा पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. 6 बुक्कींचा समावेश आहे. ही कारवाई बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास केली आहे. पोलिसांनी 5 लाख रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये 16 मोबाईल आणि 2 लॅपटॉप जप्त केले आहे
गौरव दयाराम धरमवाणी (27, मुळ छत्तीसगड), सुनिश तुलशीदास लखवानी (25, मुळ रा. छत्तीसगड), जपजीतसिंग आतमजीतसिंह बग्गा ( 25, मुळ रा. छत्तीसगड), जसप्रित मनजिंदरसिंग सिंह (29, मुळ रा. पंजाब), तरणदीप बलजींदर सिंह (33, रा.पंबाज) व लालकिशोर दुखी राम (37, मुळ रा. बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक आरोपींसह डीके नावाच्या बुक्कीवर देखील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खराडी येथील एका सासोयटीमधील फ्लॅटमध्ये क्रिकेट बेटिंग घेत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. व पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिस पथकाने खराडी येथील एका सोसायटीमधील नवव्या मजल्यावर फ्लॅट वर छापा टाकला.
पोलिसांना फ्लॅटमध्ये अटक आरोपी बेटिंग घेत असल्याचे आढळुन आले.
लॅपटॉपमध्ये वेगवेगळ्या वेबसाईटव्दारे टाटा आयपीएल 2023 च्या
मुंबई इंडीयन्स विरूध्द लखनौ सुपर जायंट्स या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग घेतले जात होते. आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 16 मोबाईल हॅन्डसेट, 2 लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि
रोख रक्कम असा एकुण 4 लाख 80 हजार 740 रूपयाचा ऐवज पोलिसांनी तो जप्त केला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव,
सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे
पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत. पोलिस हवालदार बाबा कर्पे, पोलिस हवालदार भिवरकर, पोलिस अंमलदार संदीप कोळगे, पोलिस अंमलदार अजय राणे, पोलिस अंमलदार सागर केकाण, पोलिस अंमलदार अमेय रसाळ, पोलिस अंमलदार किशोर भुजबळ,
पोलिस अंमलदार ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.