Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कंगनाला लहानपणापासूनच फॅशनची आवड होती. मॉडेल किंवा अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न होते पण कंगनाने डॉक्टर व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. आई-वडिलांच्या आज्ञेत राहून ती त्या मार्गावर चालत होती. पण तिचे मन मात्र दुसरीकडे कुठेतरी होते. बारावीत नापास झाल्यानंतर ती घरातून पळून दिल्लीला आली पण आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.
कंगनाप्रमाणेच अर्जुन कपूरही बारावी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला. त्यानंतर त्याने शाळेत जाणे बंद केले आणि वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. आज अर्जुन एक यशस्वी अभिनेता आहे.
लहानपणापासूनच करिश्मा कपूरला अभ्यासात फारसा रस नव्हता.लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीकडे तिचा कल होता. याच कारणामुळे करिश्मा कपूरने सहावीनंतरच शिक्षण सोडले.
अभिनेत्री काजोलने पाचगणी येथील बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने पहिला चित्रपट ‘बेखुदी’ केला. यानंतर तिच्या ‘बाजीगर’ चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. अभिनयात करिअर करण्यासाठी तिने मध्यंतरी शाळा सोडली. ती बारावी पासही नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण बारावी पास आहे. ग्रॅज्युएशनसाठी तिने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. पण मॉडेलिंगमधील करिअरमुळे तिनी शिक्षण अर्धवट सोडले.
बॉलीवूडचा बजरंगी भाईजान देखील फक्त बारावी पास आहे. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील वांद्रे इलेट येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमधून झाले. यानंतर तो सेंट झेवियर्स कॉलेजमधून बाहेर पडला. मॉडेलिंग करिअरच्या शोधात सलमानने आपले शिक्षण अर्धवट सोडले.