Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी स्मार्टफोनमधील ॲप्स मदत करणार, आजच करा डाऊनलोड

47

नवी दिल्ली : Blood Sugar Control : आजकाल बदलत्या वातावरणामुळे आणि धगाधगीच्या जीवनामुळे अनेकांना उच्च शुगरचा त्रास होत असल्याचं समोर येत आहे. अनेकांना हा त्रास असतो. तर हीच Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी अनेक टिप्स समोर येत असतात. आतातर आपण स्मार्टफोनवरील काही ॲप्स डाउनलोड करून त्यांच्या मदतीने देखील Blood Sugar कंट्रोल शकता. इतरही अनेक आजारांवर नियंत्रण ठेवता येईल. तर याच ॲप्सबद्दल जाणून घेऊ…

Fittr: ज्यांना फीट राहायचं आहे त्यांना हे ॲप खूप मदत करतं, असं कंपनीचं म्हणणंं आहे. तुम्हाला व्यायामासाठी या ॲपची खूप मदत मिळू शकते कारण हे ॲप ज्यांना फीटनेसची आवड आहे त्यांच्यासाठी बनवले आहे. फिटर हा एक समुदाय आहे जो वैयक्तिक व्यायाम योजना, पोषण मार्गदर्शन आणि तंदुरुस्तीची उद्दिष्टे साध्य करू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सपोर्ट देतो.

HealthifyMe: HealthifyMe हे ॲप वापरकर्त्यांना त्यांची निरोगी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी अनेक फीचर्स ऑफर करते. हे निरोगी खाण्याच्या सवयींना सपोर्ट देण्यासाठी पर्सनल डायट प्लान, कॅलरी ट्रॅकिंग आणि पोषण मार्गदर्शन असं सारंकाही पुरवते. ट्रॅकिंग सुलभ करण्यासाठी ॲप मध्ये भारतीय पाककृतींसह खाद्यपदार्थांचा सर्वसमावेशक डेटाबेस देखील आहे.

Cult.fit: अनेकांना हे ॲप माहित असावे. हे भारतातील एक लोकप्रिय फिटनेस ॲप आहे जे विविध प्रकारच्या फिटनेस आणि वेलनेस सेवा देते. हे आरोग्य आणि निरोगीपणा स्टार्टअप Cure.fit ने विकसित केले आहे. अ‍ॅप योग, नृत्य फिटनेस, सामर्थ्य प्रशिक्षण आणि बरेच काही यासह वर्कआउट क्लासेस देखील पुरवते.

तर Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा असून वरील ॲप्स यासाठी मदत करत असल्याने या ॲप्समुळे Blood Sugar कंट्रोल होण्यात नक्कीच मदत होईल. हे सर्व ॲप्स प्लेस्टोरमधून डाऊनलोड करता येतील.

वाचा : आता मानवी मेंदूत चिप बसवता येणार, एलन मस्‍कच्या न्‍यूरालिंक कंपनीला USFDA ची मंजूरी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.