Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५ हजार ३५२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या १३४ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८६ हजार २२३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात ‘अशी’ विक्रमी कामगिरी
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित वाढ
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार २६२ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ७३८ इतका आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ७ हजार २९५ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ६ हजार ५९१ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ५७६ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ५ हजार ०११ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा- आढावा बैठकीत भाजप आमदाराला प्रवेश नाकारला; मग कार्यकर्ते संतापले आणि…
मुंबईत ३१३७ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची काल होती तितकीच ३ हजार १३७ इतकी आहे. तर, रायगडमध्ये १ हजार २००, रत्नागिरीत १ हजार ७३४, सिंधुदुर्गात १ हजार ४९३, बीडमध्ये १ हजार ३९९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०१० इतकी आहे.
नंदुरबार, भंडारा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५४९, नांदेडमध्ये ही संख्या ५२ इतकी आहे. जळगावमध्ये ३११,नागपूर जिल्ह्यात ही संख्या २१० इतकी झाली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ इतकी झाली आहे. तसेच अमरावतीत ही संख्या ५५ वर खाली आली आहे. धुळ्यात ही संख्या ४ इतकी आहे. नंदुरबार आणि भंडारा जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही.
क्लिक करा आणि वाचा- महापुरामुळे एकट्या कोल्हापुरात ‘इतक्या’ कोटींचे नुकसान; सरकारने किती दिले अनुदान?
३,७३,८१२ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ०७ लाख ५९ हजार ७६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८७ हजार ८६३ (१२.५८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७३ हजार ८१२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ५१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.