Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vivo T2x 5G वर भन्नाट डिल, २१ हजारांचा फोन ५५० रुपयांना घेऊ शकता विकत, Flipkart सुरु आहे ऑफर

7

नवी दिल्ली : Vivo T2x 5G Discount : आता मार्केटमध्ये 4G नेटवर्कची जागा हळूहळू 5G नेटवर्क घेत आहे. त्यामुळे अनेकजण 4G फोनमधून 5G फोनमध्ये स्विच होत आहेत. अशामध्ये विविध फोन कंपन्या देखील नवनवीन 5G फोन घेऊन येत आहेत. अशामध्ये आघाडीची स्मार्टफोन कंपनी विवोने देखील बरेच 5G फोन आणले असून यातील Vivo T2x 5G हा एक कमी बजेटमध्ये चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हीही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फ्लिपकार्टवरून अगदी स्वस्तात ऑर्डर करू शकता. कारण या फोनवर फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहे, ज्यामुळे याची मागणीही वाढली आहे.तर Vivo T2x 5G (128GB+8GB RAM) हा ऑनलाइन खरेदी करता येईल. तुम्ही हा फोन Flipkart वरून फक्त १५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोनची मूळ किंम २०, ९९९ रुपये आहे. याशिवाय अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. CITI क्रेडिट कार्डने पैसे भरण्यावर १०% सूट मिळणार आहे. HDFC बँक क्रेडिट कार्डवर थेट १२५० रुपयांची सूट मिळू शकते. HDFC बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारावर तर ४ हजारांची सूट मिळू शकते.

एक्सचेंज ऑफरने फोनची प्राईस अगदीच कमी होईल
या फोनवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट देखील मिळू शकते. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी तब्बल १५,४५० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. पण एवढी सवलत मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही किंमत अवलंबून असते. तर या सगळ्या ऑफर्स लागू झाल्यास फोन केवळ ५५० रुपयांना मिळू शकतो.

Vivo T2x 5G चे स्पेसिफिकेशन

या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ६.५८ इंच HD+ डिस्प्ले मिळत आहे. यामध्ये ड्युअल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. याशिवाय फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये डायमेंसिटी 6020 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. कमी बजेटचा स्मार्टफोन शोधणाऱ्या युजर्ससाठीही हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

वाचा : आता WhatsApp वर चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, इन्स्टाग्रामसारखं खास फीचर लवकरच येणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.