Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Realme 11 Pro 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज अशा तीन पर्यांयामध्ये ऑफर केला जाऊ शकतो. त्याच वेळी, Realme 11 Pro + 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे अॅस्ट्रल ब्लॅक, सनराइज बेज आणि ओएसिस ग्रीन शेड्स अशा कलर्समध्ये येऊ शकतात.
चीनमध्ये किंमत काय?
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ या महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये अनुक्रमे CNY 1,699 (अंदाजे २०,००० रुपये) आणि CNY 1,999 (अंदाजे २४,००० रुपये) या सुरुवातीच्या किमतीत सादर केले जातील.
इतर फीचर्स
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ चीनमध्ये आधीच सादर करण्यात आले होते. त्यामुळे चीनमध्ये लाँच केल्यानुसार यात ६.७ इंचाचा फुल-एचडी+ (1080×2412 पिक्सेल) कर्व्ह डिस्प्ले आहे. यात 360 Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. हा फोन Octa-core 6nm MediaTek Dimensity 7050 SoC सह सुसज्ज असेल. यामध्ये 12GB पर्यंत रॅम दिला जाईल आणि फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा दिला जाईल. ज्याचा पहिला सेन्सर १०० मेगापिक्सलचा आहे. Realme 11 Pro+ मध्ये २०० मेगापिक्सल Samsung HP 3 सेंसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. Realme 11 Pro मध्ये 67W फास्ट चार्जिंग आणि Realme 11 Pro+ मध्ये 100W चार्जिंग सपोर्ट आहे.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो