Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ahilyabai Holkar Jayanti 2023: मावळ प्रांताच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती

8

पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी ‘ म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती.आज मंगळवार, ३१ मे २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. अहिल्याबाईंचा जन्म ‘चौंडी, बीड’ येथे माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मुलाशी, ‘खंडेरावांशी’ झाले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.

आजचे आर्थिक राशीभविष्य ३१ मे २०२३: सिंहचे रखडलेले कार्य पूर्ण होतील, पाहा मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य

आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. ‘बाई काय राज्य कारभार करणार?’ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता अशी झाली, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. त्यांनी राज्यकारभारात अनेक बदल घडवून आणले. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले.

June 2023: मासिक अंक ज्योतिष; मूलांक १ आणि ८ च्या लोकांना प्रगतीचा महिना, जन्मतारखेनुसार पाहा तुमच्यासाठी कसा

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व सुद्धा केले. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.
इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

June 2023: जून महिन्यात मंगळसह या ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ५ राशीच्या लोकांनी सांभाळून राहा, अडचणीत सापडाल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.