Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नीत महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन केले. आणि मूल्यांकनात उच्चशिक्षणाचे पितळ उघडे पडले. ना शिक्षक, ना पूर्णवेळ पाचार्य, वर्ग खोल्या ना काही पायाभूत सुविधा, असे असताना महाविद्यालये सुरु आहेत. १०२ महाविद्यालयाच्या मूल्यांकनातून तब्बल ८३ महाविद्यालयांना शंभर पैकी साधे ३५ गुण ही मिळवता आले नाहीत. ही सर्व महाविद्यालये ‘नो ग्रेड’ ठरवित विद्यापीठाने प्रवेश क्षमता स्थगित, तसेच कमी असा कारवाईचा बडगा उगारला आहे.
अशाप्रकारची कारवाई करणारे हे राज्यातील विद्यापीठ पहिले ठरले आहे. यातील अनेक महाविद्यालये थेट लोकप्रतिनिधींशी संबंधित असल्याची चर्चा आहे.
विद्यापीठाने संलग्नीत महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन सुरु केले. मागील वर्षीनंतर यंदा आता १०२ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्याचे काम आठवडाभरापासून सुरु होते. मूल्यांकनाचे काम संपले अन् विद्यापीठाने ऑडिट रिर्पोट प्रकाशित केला. अहवालामुळे संस्थाचालक, शिक्षकांमध्ये खळबड उडाली आहे.
विद्यापीठाने मूल्यांकनानुसार पाच गटात महाविद्यालयांची वर्गवारी केली आहे. ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ आणि ‘नो ग्रेड’ (कोणतीही श्रेणी देण्याची पात्रता नाही) अशी विभागणी आहे. १०२ मूल्यांकन केलेल्या पैकी १९ महाविद्यालये पहिल्या चार श्रेणीत आहेत. तब्बल ८३ महाविद्यालयांना कोणतीही श्रेणी देण्यात आलेली नाही. हे महाविद्यालये ‘नो ग्रेड’ मधील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तपासणीतील ८२ टक्क्यांपेक्षा अधिक महाविद्यालये निकषातच बसत नसल्याची धक्कादयक प्रकार तपासणीतून समोर आला आहे. १९ महाविद्यालयांना ए,बी,सी,डी यापैकी एक श्रेणी प्राप्त झाली आहे. तपासणीत पायाभूत सुविधांची वाणावा आढळलेल्या महाविद्यालयातील अनेक महाविद्यालये लोकप्रतिनिधींशी संबंधित असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारची कारवाई करणारे राज्यातील हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाने अशा महाविद्यालयांची यादी जाहीर केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चा रंगली आहे.
या नियमानुसार कारवाई..
विद्यापीठ कार्यक्षेत्राअतंर्गत येणाऱ्या सर्व संलग्नीत महाविद्यालयांना विद्यापीठ शैक्षणिक विभाग कार्यालयाचे पत्र ऑनलाईन व ऑफलाइन पाठविण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ११७ (०१) व (०२) अन्वये मूल्यांकन करण्यात आले. ज्यांची नावे नो ग्रेडमध्ये आहेत, त्यांना आक्षेपासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
प्रवेश क्षमता स्थगित!..
शैक्षणिक मूल्यांकनात नो ग्रेड मिळालेले सर्वाधिक ३३ महाविद्यालये बीड जिल्ह्यातील आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण ३७ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले. यात नोग्रेड ३३ महाविद्यालये आहेत. छत्रपती संभाजीनगर २८ पैकी १९, जालना ११ पैकी नोग्रेड ९, धाराशिवमध्ये २६ नोग्रेड २२ महाविद्यालये आहेत. महाविद्यालयांची पायाभूत सुविधा व मनुष्यबळ तपासून प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी संख्याही घटविण्यात येणार आहे.
नवीन महाविद्यालयांना राज्य शासन, व्यावसायिक महाविद्यालयांना स्वायत्त परिषदांकडून मान्यता मिळते. परंतु महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता तपासणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. प्रशासन म्हणून आम्ही आमचे उत्तरदायित्व पार पाडतोय.
डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.