Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Career After SSC: दहावी उत्तीर्ण झाल्यावर आता पुढे काय करायचं? जाणून घ्या सर्वकाही

21

Best Career Option: इयत्ता दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. येथूनच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. येथूनच त्यांना कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, हे ठरते. हायस्कूलनंतर आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स यापैकी कोणता विषय निवडायचा? याविषयी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही अधिक चिंतेत असतात. कोणते क्षेत्र निवडल्यावक करिअरमध्ये चांगले पर्याय मिळू शकतील हे विद्यार्थी आणि पालक दोघांनाही समजत नाही. अशा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. याचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांना कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे? हे विद्यार्थीच सहज ठरवू शकाल.

आधी स्वतःला तपासा

पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना कोणता विषय वाचायला आवडतो हे त्यांनी स्वतः ओळखले पाहिजे. तुम्हाला आपलासा वाटणाराा विषय कोणता आहे? तुम्हाला कला, विज्ञान किंवा वाणिज्य यापैकी कोणते क्षेत्र सर्वाधिक आवडते? हे समजून घ्या. यासाठी तुम्हाला स्वतःचा शोध घेणे आवश्यक आहे. हे जाणून घेतल्यास अर्धे काम तितकेच सोपे होईल. या कामात तुम्ही तुमच्या शिक्षक किंवा समुपदेशकाचीही मदत घेऊ शकता.

पालकांशी चर्चा करा
विद्यार्थ्यांनी आपले आवडते क्षेत्र निवडल्यानंतर त्याबद्दल पालकांना समजावून सांगा. कला, विज्ञान किंवा वाणिज्य हे स्ट्रीम का निवडायचे आहे? यामागे तुमचा विचार काय आहे? हे विषय निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे, तेही स्पष्ट करा. यासोबतच भविष्यात तुम्हाला कोणत्या संधी आहेत, या सर्व गोष्टींची माहिती पालकांना द्या.

पालकांनीही मुलाची निवड समजून घेतली पाहिजे
पालकांना सल्ला दिला जातो की, जेव्हा जेव्हा तुमचे मूल तुमच्याशी कोणत्याही विषयावरून दहावी-बारावीच्या अभ्यासाबद्दल बोलायला येईल, तेव्हा आधी त्याचा मुद्दा शांतपणे समजून घ्या. मुलावर असे कोणतेही दडपण आणू नका. काय करायचे आहे? हा निर्णय पूर्णपणे मुलांवर सोडा.

प्रत्येक क्षेत्रात अनेक संधी
आजकाल विज्ञान, वाणिज्य किंवा कला या तिनही स्ट्रिममध्ये अनेक संधी आहेत. बदलत्या काळानुसार पारंपारिक कोर्सेसमध्ये नवीन अभ्यासक्रम वाढले असून त्यासोबत करिअरचे पर्यायही वाढले आहेत. त्यामुळे आपल्या मुलाने गणिताव्यतिरिक्त कोणताही विषय निवडला असेल तर त्यांना चांगले चान्स मिळणार नाहीत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.