Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 13 वर भन्नाट ऑफर, थेट ३८,००० वाचवण्याची संधी, पाहा नेमकी ऑफर काय?

7

नवी दिल्ली : iPhone 13 हा सध्या लेटेस्ट फीचर्ससह येणारा Apple चा स्वस्त स्मार्टफोन आहे. iPhone 14 लाँच झाल्यानंतरही iPhone 13 ची क्रेझ कमी झालेली नाही. कारण iPhone 13 स्मार्टफोनमध्येही कंपनीने अगदी दमदार फीचर्स आधीच देऊ केले आहेत. आता जर तुम्हीही हा आयफोन १३ खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कदाचित तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, कारण Apple ने iPhone 13 सर्वात कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. काही दिवसांनंतर, सप्टेंबर महिन्यात iPhone 15 स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. अशा परिस्थितीत iPhone १३ खरेदी करण्याची ही सध्याची सर्वोत्तम संधी आहे.

Apple iPhone 13 च्या Starlight कलर व्हेरिएंटची मूळ किंमत ६९,९९९ रुपये आहे. ही फोनच्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा फोन ११ टक्के डिस्काउंटनंतर ६१,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच फोनच्या खरेदीवर तब्बल ३३ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. निवडक स्मार्टफोन्सच्या एक्सचेंजवर तर ३००० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील आहे. याशिवाय HDFC कार्डवर २००० रुपयांची सूट दिली जात आहे. पण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही रिटर्न देणाऱ्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असणं गरजेचं आहे. या सर्वाशिवाय हा फोन ४,९९९ रुपयांच्या मासिक EMI पर्यायावर देखील खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या खरेदीवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स
ॲपलच्या या iPhone 13 च्या फीचर्सचा विचार केला तर याचा डिस्प्ले हा ६.१ इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये 12MP मुख्य कॅमेरा आहे. तसेच आणखी एक 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनच्या फ्रंटसाईटला आणखी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. हा एक दमदार प्रोसेसर असल्याने फोन अगदी स्मूद चालतो.

वाचा : Google ने ‘या’ ॲप्सवर घातली बंदी, फोनमध्ये असतील तर लगेचच करा डिली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.