Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या स्कॅममध्ये नेमकं काय होतं?
हॅकर्स तुम्हाला फेसबुकवर तुमचा मित्र किंवा ओळखीचं अकाउंच असल्याचं सांगून मेसेज पाठवतात. त्यावर लिहिलेलं असतं Look who died (पाहा कोण मेलं आह?) जर या मेसेजमधील लिंक तुम्ही ओन केली तर त्याती हॅकर्सच्या सॉफ्टवेअरमुळे हॅकर्सना तुमचे Facebook खाते लॉगिन तपशील मिळतो. हे तपशील वापरून, हॅकर्स वापरकर्त्याच्या खात्यात लॉग इन करतात आणि नंतर त्यांच्या खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळवतात. यासह, केवळ वैयक्तिक तपशीलच नाही, तर तुमचे बँक खाते किंवा आर्थिक माहिती तुमच्या खात्याशी जोडलेली असेल, तर तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते.
वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब
या स्कॅमपासून कसं सावध राहाल?
- तुम्ही अगदी स्ट्राँग पासवर्ड ठेवला पाहिजे. हा पासवर्ड अगदी युनिक असा पासवर्ड असायला हवा. तसेच, Two Step Verificaton देखील ऑन ठेवा
- वैयक्तिक तपशील ऑनलाइन शेअर करताना तुम्ही खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
- कधीच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणं किंवा अज्ञात सोर्सकडन आलेली फाईल डाउनलोड करणे टाळावे. अशा लिंक्स अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
- फोनला कायम लेटेट अपडेट्सनी अपडेटेड ठेवा.
वाचा : Google ने ‘या’ ॲप्सवर घातली बंदी, फोनमध्ये असतील तर लगेचच करा डिली